बिहार निवडणूक नामा – भाजपने फेकला बिहार निवडणुकीत चूनाव जुमला

0
60

_*जी लस अजून अस्तित्वातच नाही ती लस मोफत कशी..।🦠*_

*भाजपचा बिहार निवडणूकीत जाहीरनामा !*
भाजपने बिहारमध्ये पुन्हा एक चुनावी जुमला फेकला आहे. तो म्हणजे कोरोना लस. *जगातील हे एकमेव उदाहरण असेल की,फक्त एका राज्याच्या जनतेला मतांच्या बदल्यात कोरोना लस फ्री मिळणार आहे.* अमेरिकेतही निवडणुका आहे मात्र, तिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी कोणतीही घोषणा केली नाही. खरेतर त्या ट्रम्पना डोकेच नाही आहे. त्यांनी असे चुनावी जुमले त्यांच्या भारतातील दोस्ताकडून शिकायला हवे.१५ लाखाच्या अशाच चुनावी जुमल्यात भारतातील गरिब सर्वसामान्य जनता पुरती फसली आहे. सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक प्रचारात विरोधकांच्या सभा गर्दीने फुल्ल होत आहेत. त्यामुळे सत्ताधारी जेडीयु-भाजप युतीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. *म्हणून भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यात बिहारी जनतेला चक्क कोरोना लस फ्री देण्याची घोषणा खुद्द देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी प्रचारादरम्यान केली आहे.* एकीकडे भारतात ७७ लाख कोरोना बाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे.त्यामुळे साहजिकच इथे उपचाराची जादा आवश्यकता आहे. मात्र,या दोन राज्यात निवडणुका नसल्यामुळे येथील जनतेला स्वतःच्या खिशातून उपचार करावे लागत आहे. *परंतु, जी लस अजून तयारच झाली नाही ती लस बिहारमध्ये मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.*
किती खोटे बोलायचे,किती जनतेला फसवायचे याचा जराही विचार केंद्रातील सरकार करीत नाही.!
कोरोनासारख्या गंभीर आजारावर लस उपलब्ध झाली की ती शक्य तितक्या वेगात देशातील सर्व नागरिकांना ‘फुकटात’ पुरवणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

आज बिहारसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना सत्ता आली तर बिहारमध्ये आपण ही लस फुकटात पुरवू असं पहिलं आश्वासन केंद्राने दिलंय. कोरोना लस ही पक्षीय प्रॉपर्टी वाटू लागली आहे काय? लस पुरवणे ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे हे केंद्रातील सरकारला लक्षात येत नाहीये काय? कोरोनाच्या लसीचा आपल्या राजकारणासाठी वापर करताना केंद्र सरकारला जरातरी लाज वाटली असेल काय? ज्या आजाराने देशात एक लाखांहून अधिक लोक ‘ऑफिशियली’ मृत्युमुखी पडले आहेत, लाखो लोक बरे झाले असले तरी थकले आहेत अश्या या आजाराच्या अजून प्रयोगशाळेतच असणाऱ्या लसीचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं हे कुठल्या मानवी संवेदनेत बसतं ?या देशात पोलिओची लस फुकटात आणि सर्वांना मिळावी म्हणून गेली तीसहून अधिक वर्षं कार्यक्रम राबवला जात आहे. या प्रयत्नांची दखल WHO सहित अनेक संस्थांनी घेऊन भारताचं कौतुक त्यासाठी केलंय. आणि आज या देशात सत्तेवर असणारा पक्ष कोरोनाच्या लसीत राजकारण आणतो.सभ्य मानवी जगात ह्या असल्या राजकीय संधीसाधूपणाबद्दल फक्त घृणा वाटू शकते.!
मृत्यूच्या काळात मतांसाठी कोरोना लसी’चा भावनिक राजकार करणे योग्य नाही.आवडते राज्य बिहार असल्यामुळे तिथे कोरोना लस फुकट देणार अन् मग बाकीचे राज्याकडून पैसे घेणार का.? हे घाणेरडं आणि नीच पातळीचं राजकारण आहे.म्हणे कोरोनाची लस सर्वात पहिली बिहारला देऊ आणि मोफत देऊ.मुळात लस आलीय का? ती निवडणुकीच्या आधी येणारंय का?लस आली न् मोफत दिली तर काय उपकार करणार आहात का? मग बाकीच्या ठिकाणी धंदेवाईक दुकान लावून विकणार आहात का?
आणि निवडणूक आहे म्हणून बिहारवर जीव उतू चाललाय का? बाकीच्या राज्यांनी तुमचं घोडं मारलंय का? पुढं बंगालच्या निवडणुकीत हेच आश्वासन देणार का? आणि गेल्या पंधरा वर्षांत बिहारला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली का?ते बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणार होता त्याचं काय झालं? दलाल पद्धतीनं बोली लावून तुमचा तो महान नेता बिहारला एक लाख तीस हजार कोटी रुपये निधी देणार होता, तो दिला का?अरे,किती गंडवाल रे? *आपण आपल्याच भारतीय लोकांना चुत्या बनवतो, हे का लक्षात येत नाही तुमच्या? तुम्ही भारतीय नाही का?*
का तुम्ही जातीजातीत,धर्माधर्मांत, प्रदेशाप्रदेशात भेद लावून देता? आपल्याच देशात हे घाण विकृत राजकारण का खेळता?

कोरोनाच्या लशीवरून आठवल.एकेकाळी पोलियो ही भारतातली मोठी आरोग्य समस्या, लुळी पांगळी असहाय खुरडत चालणारी माणस, तडजोड करून आयुष्य जगणारी माणस सगळ्यांच्या डोळ्यासमोर असायची.पोलियोचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १९८५ पासून प्रयत्न सुरु झाले.जन्मलेल्या मुलांना लसीकरण अनिवार्य होतच पण सतत ठराविक काळाने एकाच वेळी सगळ्या पाच वर्षाखालील बालकांना पोलियो डोस द्यायचा यासाठी नियोजन सुरु झाल.लक्षावधी वेगवेगळ्या स्तरातले सरकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करून हे अभियान नेटाने राबवल.

“ दो बुंद जिंदगी “ हे स्लोगन घेऊन देश पोलियो हटाव मोहिमेत सहभागी झाला.
रविवारी सकाळी खांद्याला पांढऱ्या रंगाचे कंटेनर लावून घरोघरी जाणारे आरोग्य कर्मचारी नेहमीच दृश्य झाल.२०११ मध्ये पोलीयोचा शेवटचा रुग्ण नोंदवला गेला.२७ मार्च २०१४ ला,जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलियो मुक्त देश म्हणून जाहीर केल.१९८५ ते २०११ या कालावधीत राजीव गांधी,व्ही पी सिंग,चंद्रशेखर , पी व्ही नरसिंह राव, देवेगौडा,इंद्रकुमार गुजराल,वाजपेयी आणि मनमोहनसिंग प्रधानमंत्री होऊन गेले.

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या पैकी एकाही माणसाने पोलियो लसीकरण फुकट करतो म्हणून राजकीय बाजार मांडला नाही, यापैकी एकाही माणसाने मागच्या सरकारची योजना म्हणून ना लसीकरण बंद केले ना स्वतःच्या नावाचे ढोल वाजवले.हि 140 कोटींच्या प्रचंड देशात राबवलेली मोहीम संपूर्ण पणे सरकारने खर्च करून केलेली होती.

या तत्कालीन नेत्यांनी,त्यांच्या सोबत असलेल्या आरोग्य मंत्र्यांनी आणि लक्षावधी भारतीय कर्मचाऱ्यांनी आणि कोट्यावधी लेकरांच्या आईबापांनी देशाला पोलियो मुक्त केल..
तुम मुझे वोट दो,
मै तुम्हे लस दूंगा.!!
काल आमचे आदर्शवत नेते म्हणायचे,
तुम्ही आम्हास रक्त द्या,
आम्ही तुम्हांला तुमचे स्वातंत्र्य मिळवून देऊ,
आजकालचे माथी मारलेले नेते म्हणतात,तुम्ही आम्हांला मतदान करा,
आम्ही तुम्हांला आश्वासनांची लस टोचू.!!

आश्वासनांच्या लसीने माणसे ,भुलली जातात ,
झुलली जातात ,डोलली जातात.
माणसे शुध्दीवर येईपर्यंत ,
बिचारे चारीबाजूने लुटली जातात.!!
आम्हा भारतीयांना दिलाय,
अनमोल मतदानाचा अधिकार,
आपले किमती मत कुठे विकू नका.!!
बिहारींना कोरोना लस घ्यायची असेल तर ७ नोव्हेंबर पर्यंत टोचून घ्या,
नाहीतर ती कोरोना लस पुढे पश्चिम बंगाल ला जाणार आहे.।
लेखक –
✍️शिवश्री संतोष शकूंतला
आत्माराम बादाडे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here