जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर यांच्या मातोश्री माय यांना निंबोळा ग्रामस्थांची भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी व या
1 min read
वासोळ – कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज प्रतिनिध
-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मातोश्री मुलकन(माय)तानाजी आहेर यांना निंबोळ्याचे सरपंच प्रदीप निकम आणि स्वर्गीय पंकज दादा निकम मित्रपरिवार व निंबोळा ग्रामस्थांच्या वतीने शोकाकुल वातावरणात सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली व आहेर कुटुंबीयांना ईश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती देवो अशी देखील प्रार्थना करण्यात आली.यावेळी निंबोळ्याचे सरपंच प्रदीप(मुन्ना) निकम,सुधाकर निकम,गोरख देवरे,विनोद गरुड, राजेंद्र अहिरे,अरुण सावंत,विठ्ठल देवरे,वसंत निकम,दीलीप गरुड, रवी गरुड,अशोक देवरे,संजय ठाकरे,विलास निकम,जगन्नाथ निकम,भाऊसाहेब देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
