
भारत पवार. : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ नाशिक : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क. : सन २०२४ _ ०२५ या वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आले यात देवळा तालुक्यातील माळवाडी, बागलाण तालुक्यातील सोमपूर तर सिन्नर तालुक्यातील भोकणी , चांदवड तालुक्यातील उर्धुळ , मालेगाव तालुक्यातील डाबली , निफाड तालुक्यातील वडाळी नजीक आदी ग्रामपंचाती रेस मध्ये होत्या. त्यांचा निकाल सगळ्यात प्रथम कसमादे टाइम्स आणि महाराष्ट्र न्यूज च्या हाती नुकताच लागल्याने सर्वप्रथम राज्य मुख्यसंपादक भारतराज पवार यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४ _ ०२५ मध्ये नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील समितीद्वारे निवड झालेल्या प्रथम क्रमांक देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीने पटकावला , द्वितीय क्रमांक बागलाण तालुक्यातील सोमपूर ग्रामपंचायतीला मिळाला तर सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामोन्चायतीने तिसरा क्रमांक घेतला आहे.
विशेष पुरस्कार मध्ये _ चांदवड तालुक्यातील उर्धुळ ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक विशेष पुरस्कार ( सांडपाणी व्यवस्थापन ) , मालेगाव तालुक्यातील डाबली ग्रामपंचायतीला _ स्व. आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार ( शौचालय व्यवस्थापन ) तर निफाड तालुक्यातील वडाळी नजीक ग्रामपंचायतीला _ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार ( पाणी गुणवत्ता पाणी व्यवस्थापन ) घोषित करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तर्फे तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक , सर्व गावातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायतीचे सदस्य आदींचे अभिनंदन केले आहे.





