जि. प .च्या डॉ. वर्षाताई फडोळ तर विभागीय उपआयुक्त श्रीमती भावके यांची संपादक भारत पवार , राजेंद्र राऊत पाटील यांनी घेतली ग्रेट भेट त्यांनी आश्वासन दिले थेट

0
113

(वरील छाया चित्रात डावीकडून महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल चे मुख्य संपादक मा.भारतराज पवार , संपादक तथा युवा मराठा महासंघाचे राजेंद्र राऊत पाटील , राज्य सरचिटणीस हारूनभाई शेख , इम्तियाज अत्तार, सुनील गांगुर्डे ,तौफिक शेख आदी)                                                                    भारतराज पवार : मुख्य संपादक.                             पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१.        नाशिक : कटा महाराष्ट्र न्यूज वेब न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी काल बुधवारी आमरण उपोषणाला बसणार असल्याची दिलेली हाक नाशिक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्राम पंचायत) व विभागीय महसूल उपआयुक्त यांनी दिलेल्या लेखी थेट आश्वासनानंतर तूर्ते स्थगित करण्यात आले.

मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावातील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका  व तेथील सरपंच यांनी  केलेला अनागोंदी कारभार आणि मनमानी कारभारामुळे राऊत यांनी गेल्या तीन वर्षांपासून लढा उभारला होता. लढयास यश आले परंतु मालेगाव पंचायत समितीचे कारभारी लय भारी की त्यांनी या लढ्यास चालढकल करण्याचे संथ गतीचे हत्यार वापरले होते.पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी बुधवार २४ जानेवारी ०२४ रोजी दु.११ वाजता विभागीय महसूल आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देताच मालेगाव गटविकास अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांचे सूप वाजले.पत्रकार राऊत यांना मोबाईल वरती मालेगावचे बिडीओ यांनी संपर्क करून उपोषणास बसू नका अशी विनंती केली.त्यांच्या विनंतीस मान देऊन पत्रकार राऊत यांनी माझ्या मागण्या तात्काळ मान्य केल्यास तर उपोषण मागे घेणार असे ठोस आश्वासन देत महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारतराज पवार यांचेशी संपर्क केला.आणि लागलीच आपण जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) डॉ.वर्षाताई फडोळ व विभागीय महसूल उपआयुक्त श्रीमती भावके यांची थेट भेट घेण्याचे ठरले. पत्रकार तथा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत,पत्रकार भारतराज पवार यांनी यावेळी डॉ. वर्षाताई फडोळ यांची भेट घेत चर्चा करण्यात आली.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षाताईंनी लेखी आश्वासन देत थेट कारवाई करणार असा मी विश्वासाने तुम्हा पत्रकार बांधवांना शब्द देते.असे सांगितले.यावेळी पत्रकार भारतराज पवार यांनी देवळा तालुक्यातील निंबोळा ग्रामपंचायतीच्या खैरनार ग्रामसेवक यांच्या गैर कारभाराविषयी चर्चा करून आपण याबाबत लवकरच तुम्हास भेटणार असे सांगून माळवाडी ग्रामपंचायती विषयी यावेळी चर्चा करण्यात येऊन देवळा येथील गटविकास अधिकारी देशमुख येत्या ५ फेब्रुवारी नंतर देवळा पंचायत समिती कार्यालयात काही दिवसांसाठी हजर होणार असल्याची शक्यता असल्याने त्यांचेशी चर्चा काय घडते मग आपणास भेटून मी सविस्तर चर्चा करणारच असेही पत्रकार पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार हे उपस्थित होते.

तर दुपारच्या सत्रात विभागीय महसूल उपआयुक्त श्रीमती भावके यांची भेट घेऊन आमरण उपोषणाला बसणार असल्याची चर्चा करण्यात आली यावेळी उपआयुक्त भावके मॅडम यांनी सकारात्मकता निर्णय देत उपोषण करू नका.तुम्हास काही दिवसात न्याय भेटून जाईल असेही सांगितले.यावेळी विभागीय महसूल सहा.आयुक्त मनोजकुमार तात्याराव चौधर यांनी एक तास वेळ देत चर्चा केली. यावेळी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारतराज पवार , युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत,महासंघाचे राज्य सरचिटणीस हारूनभाई शेख ,चांदवड तालुका अध्यक्ष सुनील गांगुर्डे, इम्तियाज अत्तार , तौफिक शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here