भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून पहाटे पासून तर दुपारी साधारणतः दीड दोन वाजेपर्यंत रांगेत तासनतास ताटकळत उभे राहून गॅस सिलिंडर मिळेलच याची गॅरंटी नसून त्यामुळे बऱ्याचदा उन्हातान्हात उभे राहूनही घरी रिकामे परतावे लागते त्यामुळे ग्रामीण भागात मोठी संतापाची लाट उसळत आहे.
याबाबत जिल्ह्यातील देवळा तालुक्यात सर्वच गावी गॅस सिलिंडर बाबत मोठी बोंबाबोंब निर्माण झाली असून ऑनलाइन सिलिंडर नोंदणी केल्यानंतर तब्बल २० ते २५ दिवसांत सिलिंडर मिळणार ते ही पूर्वी सारखे सिलेंडर एजंट घरी आणून न देता गावात कुठेतरी रिकाम्या जागी रिकामे सिलेंडर घेऊन जाऊन रांगेत नंबर लावावा लागतो आणि एवढे करूनही बऱ्याच वेळा सिलेंडर ची गाडी येत नसते एजंट फोन करून सांगतो आज कंपनीतून गाडीच आली नसल्याकारणाने मी येऊ शकत नाही त्यामुळे उन्हात उभे राहून सुद्धा सिलेंडर मिळेलच याची गॅरंटी नसल्याकारणाने देवळा तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाला असून गॅस सिलेंडर अभावी ग्राहकांची मोठी होरपळ होत आहे. याचा अनुभव तालुक्यातील माळवाडी , फुलेमाळवाडी गावातील ग्राहकांना येत असून नंबर लाऊन सुद्धा ऐनवेळी सिलेंडर नाही असे एजंटने सांगताच ग्राहकांची मोठी कुचंबना होत असून नेमका काय प्रकार आहे ग्राहकांची का कुचंबना केली जात आहे ? याचा खुलासा कंपनीद्वारे करण्यात येईल काय ? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. गॅस सिलिंडर मुळे ग्राहकांची होणारी होरपळ आणि परवड कधी थांबणार ? असा सवालही नागरिक करत असून याकामी देवळा तहसीलदार कुलकर्णी आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी शारदा गावंडे यांनी आपल्या कर्तव्यात पारदर्शीपणा आणून स्वतः लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा ह्या गॅसच्या भडक्या बरोबर संतप्त नागरिकांचा भडका केव्हा उडेल हे सांगता येत नाही .अशी संतप्त प्रतिक्रिया माळवाडी _ फुले मालवाडीतील नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.
घरगुती अनुदान : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ( PMUY) ग्राहकांसाठी सरकारने प्रति १४.२ कि.सिलेंडर ३०० रु. चे अनुदान सुरू ठेवले असून वर्षातून ९ रिफिल्स पुरते मर्यादित आहे.





