महाराष्ट्र न्यूज चॅनलचा दणका, श्रीरामपुर संगमनेर रस्त्याचे भाग्य उजाडले ,अधिकारी रस्त्याच्या कामास लागले
1 min read
श्रीरापूर, कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी राजेंद्र गायकवाड – श्रीरामपुर संगमनेर रस्त्यावर मरण झाले स्वस्त, बांधकाम अधिकारी झाले सुस्त ….ह्या मथळ्या खाली आम्ही आमचे कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल मधून बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीची दखल घेत बांधकाम अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामास सुरुवात केली असून अनेक वाहन चालकांनी महाराष्ट्र न्यूज चॅनलची स्तुती करून धन्यवाद दिलेत तर बांधकाम अभियंत्यांनी यापुढे काळजी घेऊन जनतच्या समस्यांना वेळीच न्याय देत जाऊन जनतेच्या भावनांना आवर घालावा अशी अपेक्षा यावेळी वाहन चालकांनी यावेळी व्यक्त केली .
