चांदवड तालुक्यात मतदान केंद्रावर खळबळ , ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी – घोषणा

0
40
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्य संपादक.                          निर्भिड , रोख ठोक बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१
चांदवड : कटा महाराष्ट्र न्यूज : दि .२०
महाराष्ट्रातील १३ जागांवर आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलेआहे. यामध्ये दिंडोरी नाशिकसम धुळे लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडतंय. सध्या इथं कांद्याचा प्रश्नच लक्षवेधी ठरतो आहे, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात यावरच सर्वाधिक चर्चा होताना दिसत होती,त्याचा मतदानावर देखील परिणाम झाल्याच एकुण चर्चेतुन पुढे आले आहे, सकाळी दहा च्या सुमारास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या एका लक्षवेधी घटनेनं येथील मतदान केंद्रावर काही काळ खळबळ निर्माण झाली. काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला.नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथले युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष आणि निषेध व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले, परंतु त्यांना पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी अशा घोषणाही या शेतकरी तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव इथं मोठा जनसमुदाय जमा झाला होता, पोलिसांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शांततेचं आव्हान करत वातावरण नियंत्रणात आणलं,चारच दिवसां पुर्वी पंतप्रधान नेरेंद मोदी यांच्या पिंपळगाव येथील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कांद्यावर बोला म्हणून जोरदार घोषणाबाजी केली होती, आणि आज प्रत्यक्ष मतदान सुरू असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान करण्यासाठी आले, दरम्यान ही घटना संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली व प्रत्येक बुथवर चर्चुचा विषय झाली,या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, १)मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्यानं मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळं मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं नका करू , कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा, असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांविषयी बोलताना केलं, आहे,  ्२) संपूर्ण दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक गंभीर विषयाला हात न घालता, कांद्याच्या भावांवर लादलेल्या निर्यात बंदी बाबतीत काहीही भाष्य न केल्यामुळे शरद सानप सारखा तरूण भर सभेत कांद्यावर बोला म्हणून पंतप्रधान मोदींना विनंती करतो, मोदी साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यावर भाष्य केले असते तर उत्तप्पादक शेतकऱ्यांनी नक्कीच स्वागत केले असते.  कुबेर जाधव – समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here