भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ 🚨 देवळा पोलिसांचा खाक्या की माणुसकीचा बळी ? नागरिकांत संतापाची लाट 🚨
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : पोलिस हे जनतेचे मित्र मानले जातात. राज्य शासन आणि गृहमंत्रालयाने पोलिस व नागरिक यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत यासाठी अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे पूर्वी असलेली पोलिसांविषयीची दहशत काही प्रमाणात कमी झाली. मात्र देवळा येथे घडलेल्या एका प्रकारामुळे पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आजही काही पोलिस अधिकारी घमेंडीच्या वृत्तीने वागत असल्याची भावना समाजात दिसून येते. नागरिकांशी बोलताना अरेरावीची भाषा, उद्धटपणा आणि अधिकाराचा धाक दाखविणे यामुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे बोलले जाते. अशीच एक धक्कादायक घटना देवळा येथे घडल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी देवळा येथील आठवडे बाजाराच्या दिवशी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे रविवारी देवळा येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व वाहनांची गर्दी असते. गावात वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे अनेक वाहन चालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात, तर दुसऱ्या बाजूला व्यापारी दुकाने लावतात. असे चित्र अनेक वर्षांपासून सुरू असून आजपर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही.
नागरिकांच्या मते, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाने नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. कायदेशीरदृष्ट्या जनजागृती करणे, वृत्तपत्रांद्वारे सूचना प्रसिद्ध करणे किंवा संबंधित ठिकाणी “नो पार्किंग”चे फलक लावणे गरजेचे असते. मात्र संबंधित ठिकाणी ना पोलिस प्रशासनाकडून कोणती सूचना देण्यात आली, ना नगर पंचायतीमार्फत नो पार्किंगचे फलक लावण्यात आले. आजही त्या ठिकाणी असे कोणतेही फलक नसल्याचे दिसून येते.
तरीदेखील देवळा पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अचानक कारवाई करत वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली. वाहन चालकांना थेट न्यायालयीन प्रक्रियेकडे पाठवून दंड वसूल करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “पूर्वसूचना नसताना आणि नियम स्पष्ट न करता ही कारवाई का करण्यात आली?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे देवळा पोलिसांचा खाख्या की माणुसकीचा बळी ? असे वाटू लागल्याने नागरिकात संतापाची लाट उसळत आहे.
या संपूर्ण प्रकारात संबंधित अधिकारी मॅडमने आपल्या पदाचा गैरवापर केला काय? स्वतःचा खाक्या दाखविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून त्यांचा बळी देऊन स्वतःचा उल्लू शिधा केला काय ? असे अनेक प्रश्नही जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत. “जनतेचे मित्र” म्हणविणाऱ्या पोलिसांकडूनच जर अशा प्रकारे वागणूक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? अशी तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहे.
या घटनेमुळे देवळा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणा बाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कायदा सर्वांसाठी समान असताना पोलिस अधिकारीच नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन कारवाई करू शकतात काय? असा सवालही आता जनतेतून मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे. तर त्यादिवशी नियमबाह्य कारवाई तर केलीच परंतु रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उभ्या असलेल्या वाहनांवर केली मात्र उजव्या बाजूला असणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा बडगा उगारला नाही.व्यावसायिकांच्या दुकानामुळे वस्तू खरेदी करणाऱ्यांची गर्दी खूपच असते त्यामुळे वाहतूक खूपच ठप्प होत असते. जणू काही अपघात होईल की काय ? असे सतत वाटते. तरी सुद्धा रस्त्याची उजवी बाजू रहदारीस मोकळीच होती असे त्या अधिकारी मॅडम ने भासविले. त्या बाजूस कारवाई केली नसल्याने अशी एकेरी भूमिका घेऊन कारवाई करणे हे कायद्याने योग्य नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून अन्याय केलेल्या नागरिकांना न्याय द्यावा अशीही मागणी होत असून. याकडे देवळा तालुक्यातील जनतेचे लक्ष वरिष्ठांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन येथील पोलिसांना व अधिकारी वर्गास जनतेशी आपुलीने कसे वागावे ? अती अरेरावी न करता आपण माणूस तर समोरचा नागरिक जनावर नसून तो माणूसच असतो याचीही जाणीव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून देऊन त्यांची कान उघाडणी करावी जेणे करून असा काळीमा फासणारा आणि उद्धट वर्तणुकीचा प्रकार घडणार नाही याची खूप काळजी घेण्याची गरज वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्माण झाली आहे. अन्यथा पोलिस प्राधिकरण आणि लोकायुक्त यांचे कडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्य संपादक भारत पवार यांनी यावेळी दिला. जनहितार्थच्या दृष्टीने बातमी पुढील सर्व ग्रूप मध्ये सेंड करावी . / शेअर करावी. बातमी चांगली वाटल्यास लाइक करा आणि आपल्या प्रतिक्रिया ९१५८४१७१३१ ह्या मो.नंबर वर कळवा. तसेच पोलिसांनी आपल्यावर कधी अन्याय केला असेल तर नक्कीच वरील मो .नंबर वरती कळवा.आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेतली जाऊन ” महाराष्ट्र न्यूज ” मधून प्रसिद्ध करून अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला जाईल. ____________ मुख्य संपादक





