June 27, 2022

मालेगाव व्हेंटिलेटर शोध आणि बोध : रुग्णाचे नातेवाईक किती खाणार खस्ता ,आयुक्त आता तरी दाखवतील का सत्याचा रस्ता …?

1 min read

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- ( स्पेशल वृत्तांत भारत पवार )-  कोरोना ने सर्वत्र कहर च केले असल्याने त्याचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असून नासिक जिल्ह्यातील प्रशासन सुद्धा याकमी व्यस्त असतांना मालेगाव येथील महापालिका अंतर्गत असलेल्या सहारा हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांनी गालबोट लावला आणि होत्याचे नव्हते केले ह्या हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंट दाखल असतांना सुध्दा येथील व्हेंटिलेटर लोटस नामक खाजगी हॉस्पिटलला त्यांच्या मागणी वरून लोटले ( दिले होते)  मग ते का दिले ? कोणाचा आशिर्वाद घेऊन दिले ? सहारा मध्ये दाखल झालेले पेशंट चा ” सहारा ” काढुन त्यांना बेसहारा का करण्यात आले ? व्हेंटिलेटर त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये लोटने अर्थात देणे हा सोपस्कार कायदेशीर होता का ?आणि जे रुग्ण दगावले त्यांचा वारसाचा प्रश्न संबंधित अधिकारी आणि मालेगाव मनपा घेणार काय ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकारी यांचे कडे असतील तर त्यांनी जाहीर करावं आणि जर जाहीर करता येत नसतील तर मग व्हेंटिलेटर कोणत्या नियमानुसार दिले गेले होते ,त्यावेळी सहारा मध्ये अनेक पेशंट दगावले हे गुलदस्त्यात ठेवणे योग्य का ? कोविड 19 चा रुग्ण मग तो  100 टक्के मरतोच असे म्हणता तर नाही येणार ना ? मग व्हेंटिलेटर का दिले ? सहारा कडे असे किती एक्सटरा ( जादा ) होते ? जर व्हेंटिलेटर लोटस कडे लोटले तर आयुक्तांचा तसा आदेश संबंधित डॉक्टरांना होता काय ? का पेशंटच्या आणि पेशंटच्या भावनांशी खेळलात ? आणि विशेष म्हणजे लोटस वाल्यानी अशा गोंडस पणाचे धाडस कोणाच्या हिमतीने केले की त्यानी सहारा मधील गरीब पेशंटचा विचार न करता चक्क व्हेंटिलेटरची मागणी करावी आणि त्या मागणीचा लाड संबंधीत डॉक्टरांनी पुरवले नेमका कोणता उद्देश साध्य केला गेला ? याची शहा निशा होणे तितकेच गरजेचे सुद्दा आहे . याचा शोध घेऊन तो बोध झाला पाहिजे आणि हा बोध होऊन जनते समोर सत्य उजेडात येत नाही तो पर्यंत माझी लेखणी जनतेच्या आणि रुग्ण तसेच रुग्णांच्या नाते वाईकांसाठी सुरूच राहील यात शंका नाही .कारण आपण जनतेचे नोकर आहोत जनसेवा करण्या साठीच आपल्याला शासन गडगंज पेमेंट देते तरी अशी गद्दारी कायद्याने योग्य आहे का ?आणि लोटस वाले जर कोविड सेंटर उभारू शकता तर मग जास्तीत जास्त व्हेंटिलेटर ( जादा) आणून ठेवणे आवश्यक होते किंवा जर मागवायचेच होते तर कंपनी कडून का मागणी करू शकले नाही ? किंवा मालेगाव मध्ये खूप मोठे मोठे दवाखाने आहेत तिथे त्यानी मागणी करू नये ? सहाराचा आसरा घेऊन सहारालाच बेसहारा करून आपले लोटसचे हित साध्य करून सहारा मधील गरिब – मध्यम पेशंटना मारणी घालून फलित काय ? शासनाने ठरवून दिलेल्या रेट ( दर )प्रमाणे लोटस वाले डॉक्टर कोरोना पेशंटला उपचार देतात का हि मोठीच शंका असून मालेगाव मनपाचे कर्तव्य दक्ष आयुक्त कासार साहेब ,उपायुक्त कापडणीस साहेब यांनी याकामी जातीने लक्ष माझ्या मागील बातमी नुसार घातले असणार असे गृहीत धरून वरील सर्व बाबतीत कर्तव्यात कसूर न करता वरील घटनेचा शोध आणि बोध उघडकीस झाला पाहिजे अन्यथा मी स्वतः मालेगाव मनपा आयुक्त , लोकायुक्त ,राज्यपाल मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आणि सहाराचा बेसहारा करून तेथील रुग्ण वाऱ्यावर सोडण्याचा प्रकारचा बोध घेणार मृतांच्या नातेवाईकाना न्याय देणार . आणि लोटसच्या डॉक्टरांनी हा गोंधळ का करावा याचीही मागणी करणार असल्याचे संपादक भारत पवार यांनी म्हटले आहे.

***  ** * ** *** *****

संपुर्ण महाराष्ट्रातील शहरात,तालुक्यात , जिल्ह्यात पत्रकार  / जाहिरात प्रतिनिधी व मालेगाव महानगरात  आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती सुरू आहे .पत्रकारिता करु इच्छित असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा .

संपर्क : भारतराज पवार , मुख्य संपादक ,कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” 9158417131

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.