September 21, 2023

सामाजिक बाधिलकीची जाणिव ठेऊन नवी मुंबई मनसे तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न ,रक्त दात्यांचा उदंड प्रतिसाद

1 min read

 

नवी मुंबई_ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” मनसेच्या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद*

३८६ युनिट रक्ताचे संकलन

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक आजारांसाठी लहान मुलांना, मोठ्या माणसांना रक्ताची गरज भासत असते. थॅलेसिमिया सारख्या आजारात तर वारंवार रक्ताची गरज रुग्णाला भासते. रक्त हि अशी बाब आहे, जी कोणत्याही कंपनीत तयार होत नाही. रक्त फक्त माणसाच्या शरीरातच तयार होते. सध्याची परिस्थिती पाहता रक्त घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि रक्तदात्यांची संख्या कमी आहे.

त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून आणि सामाजिक जाणिवेतून नवी मुंबई मनसेतर्फे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या संकल्पनेतून रविवार, २० डिसेंबर रोजी सीवूड्स येथील मध्यवर्ती कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला नवी मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. ३८६ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. कोविड काळात अशा मोठ्या प्रमाणात रक्तदान होण्याची गरज आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी व्यक्त केले. तर नवी मुंबई मनसेने एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्ताचे युनिट संकलन केल्याबद्दल रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच रक्तदान शिबिरासाठी सहयोग करणारे डॉ. राजेश यांनी हे रक्तदान शिबीर कोविड काळातील नवी मुंबईतील सर्वात मोठे आहे, अशी पोचपावती मनसेला दिली. या शिबिरात पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. अशा रक्तदात्यांनी पहिल्यांदा रक्तदान करून छान वाटले अशी प्रतिक्रिया दिली.

मनसेच्या या रक्तदान शिबिरात मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष निलेश बाणखिले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, रुपेश कदम, सचिन कदम, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे , वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, रोजगार शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर संघटक सागर नाईकरे , चित्रपट सेना शहर संघटक किरण सावंत, शहर सचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, नितीन लष्कर, विद्यार्थी सेना उप शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, प्रेम दुबे, महिला सेना उप शहरअध्यक्ष अनिता नायडू, दीपाली धाऊल , शुभांगी बंदीचोडे, मनसे विभागअध्यक्ष अमोल आयवाले, भूषण कोळी, उमेश गायकवाड, नितीन नाईकडे, विनोद पाखरे, योगेश शेटे, चंद्रकांत डांगे, विशाल चव्हाण, विद्यार्थी सेना शहर सचिव निखिल गावडे, महिला सेना शहर सचिव लीना पाखरे, यशोदा खेडस्कर, सायली कांबळे, इतर पदाधिकारी आणि अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.