भऊर गावी बिबट्या ने पाच शेळ्या केल्या फस्त,गावकरी झाले भयग्रस्त,वनविभागाने पिंजरा लावून करावा बंदोबस्त– मागणी

0
27

वासोळ :

प्रतिनिधी – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” –भऊर

ता. देवळा येथे बुधवारी (दि. 7) रात्रीच्या सुमारास बिबट्याने 5 शेळ्या फस्त केल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. भऊर येथील रामनगर शिवारातील शेतकरी प्रकाश पवार यांनी घराजवळ शेडमध्ये शेळ्या बांधल्या होत्या. बुधवारी पवार हे पहाटे लघुशंकेसाठी बाहेर आले असता, तेव्हा त्यांना एक बोकड शेडबाहेर तर, शेडमधील पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच, वनरक्षक शांताराम आहेर, वनपाल राकेश आहेर, गवळी, तलाठी नितीन धोंडगे, कोतवाल, जिभाऊ गरुड, पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी सरपंच दादा मोरे, पोलीस पाटील भरत पवार, देवळा कृषी बाजार समितीचे संचालक जगदीश पवार, पंडित पवार, शैलेश पवार, दीपक पवार, शशी पवार, नितीन पवार, राजेंद्र पवार आदीनी भेट देऊन पहाणी केली तर पशुपालकांमध्ये भयग्रस्त वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्तासाठी याठिकाणी पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी करून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here