June 27, 2022

देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे दुबळा माझा ” कटोरा ” नका बनू बळीचा बकरा,आम्ही केलेला प्रकार विसरा ”’!

1 min read

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- करिता गुलाबराव पाटील याज कडून – वरील प्रकारची घटना आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र उ येथील . ह्या गावातील ग्रामपंचायतीतील गटविकास अधिकारी आणि सरपंच व अन्य व्यक्ती च्या संगणमताने सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार करून ग्रामपंचायत सरकारी दप्तरात खाडाखोड केल्याचे संताप जनक प्रकार उघडकीस आल्याने पिंप्री प्र उ गावात मोठी खळबळ माजली आहे.

याबाबत गुलाबराव पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की पारोळा गटविकास अधिकारी यांनी स्वतःचा ” कटोरा ” दुबळा म्हणून की काय ? येथील गायरान सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार करून मोठेच घबाड लुटले असून दुबळा कटोरा भरून घेतल्याचे उघडकीस झाले आहे.याबत आवाज उठविल्या नन्तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व चौकशी अँती बीडीओस मुख्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले ,स्वतः बीडीओ चेच हात माखल्याने बीडीओ ने मुख्य आरोपींना मोकाट सोडून अज्ञान आरोपी दाखवल्याचे धाडस करून एक प्रकारे नका बनू बळीचा बकरा ,आम्ही केलेला प्रकार विसरा म्हणूनच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला आदेश आमच्या पुढे कचरा असे च म्हणावे लागेल असे संताप जनक प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबत बीडीओ, सरपंच व त्यांचे सर्व सहकारी मुख्य आरोपी असून पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता बीडीओ आणि सर्व मुख्य आरोपींन वरती गुन्हा दाखल करून बीडीओ चा कटोरा रिकामा करून मला व गावास न्याय द्यावा अशी मागणी आपल्या निवेदनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव पाटील यांनी केली आहे .

****     *****      ****

**  पाहिजेत ***

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी

मुंबई, नवी मुंबई, ठाणे,कल्याण, उल्हासनगर, डोबिवली,कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर,दादर तसेच

महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात प्रतिनिधी / पत्रकार , जाहिरात प्रतिनिधी व अन्य पदे नियुक्त करणे आहेत , तरी शीघ्र संपर्क करावा ..

संपर्क : भारतराज पवार

मुख्य संपादक

9158417131

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.