जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बसले गाडीवर , का चोळतात मीठ शेतकऱ्यांच्या जखमेवर ? नका वंचीत करू शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मात करा दुष्काळावर– मागणी -वंचीत बहुजन आघाडी

0
33

 

  • जालना-  आशिश मोरे -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “– मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने  शेतकरी हवालदिल झाला आहे. महराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्याचे सोडून जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात जावून त्यांच्या जखमीवर मिट चोळण्याचे काम करीत आहेत. पालकमंत्री महोदयांनी हे सर्व स्टंट सोडून ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी निदर्शने आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केली आहे.
    याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना महामारीने शेकर्‍यांसह उद्योग धंद्यांवर मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामध्ये काही दिवसातच सततचा पाऊस सुरू झाला आणि शेतकर्‍यांच्या हाता तोंडाला आलेले पिके सर्व नष्ट झाली. या सर्व पार्श्‍वभूमीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून पंचनामे आणि पिक पाहणी दौरे सुरू करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी देखील दोन दिवसांपासून जिल्हा दौरा सुरू केला आहे. परंतू या दौर्‍या दरम्यान बैलगाडीतून स्टंट आणि फोटो शेषन करण्याचे काम सुरू झाले. स्टंटबाजी आणि फोटोशेषन थांबवून तात्काळ मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि कर्जाचा डोंगर चढत असल्याने शेतकर्‍यांची आत्महत्या थांबविण्यासाठी ओला दुष्काळ जाहिर करून तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी ही मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
    निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, आशोक खरात, विष्णु खरात, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, शफीक आत्तार, प्रकाश मंगरे, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, राहुल बनसोडे, विजय लहाणे, विष्णु कुमार शेळके, शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे, तालुका अध्यक्ष राजेद्र खरात, गौतम वाघमारे, सतोष आढाव, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here