लग्नाची पोरगी काय म्हणते ? कंत्राटी नवरा नाही म्हणते …!

0
28

 

घर मे बैठना भी एक काम है उसको भी रोजगार कहा जा सकता है।.. *नरेंद्र मोदी..*
*रोजगार म्हणजे कामगारांना कामावरून कमी करणे आणि उरलेल्या कामगारांचे अधिकार काढून घेणे म्हणजे रोजगार..*
भारत देश हा ग्रामीण भागात राहणारा शेतीप्रधान देश हे सर्व जगाला श्रुत आहे.दुर्दैवाने आमच्या प्रधानसेवकांना कोण सांगेल.हा देश कामगार मंजूर कष्टकरी जनतेच्या मनगटावर चालतो.नफेखोर अफाट पैशाचा मोह , असलेली माणसं ही देशाची कधीच नसतात,ती फक्त आणि फक्त नफेखोरी व त्यांचा व्यवसायवृद्धी ह्यात मशगुल असतात.असो.!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राक्षसी बहुमताच्या जोरावर कामगार भांडवलदारांच्या दारात विकून ठेवण्याचा कायदा पद्धशिरपणे दोन्ही सभागृहात पास केला.ह्याला पाशवी बहुमताचा वापर करून लोकशाहीची हत्त्या करणे म्हणतात.मोदी साहेब हे हिटलरच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहेत.भविष्य अंधकारमय दिसतं. असो..!
लोकसभेत कामगार कायदा विषयी विधेयक मोदी सरकारने सहमत केले यामध्ये तीनशे पेक्षा कमी मी कामगार असलेल्या कंपन्या सरकारची परवानगी न घेता कंपन्या बंद करू शकतात व जे कायम पर्मनंट कामगार आहेत त्यांना कंत्राटी कामगार मध्ये रूपांतर करू शकतात हे दोन्ही नियम कामगारांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत तरी देशातील सर्व कामगार संघटनांनी या विधेयकाचा तीव्र विरोध केला पाहिजे व हे विधेयक मागे घेण्या मोदी सरकारला भाग पाडले पाहिजे मोदी सरकारला विनंती आहे की वर्षाला तीन कोटी रोजगार देणार होते.हे राहू द्या परंतु आहे तो रोजगार काढून घेण्याचे पाप करू नका…
उद्योगपतीच्या हिताचे निर्णय घेऊन कामगारांना अडचणीत आणणारे निर्णय का बरे घेत असतील ? सरकार जनतेचे आहे की उद्योगपतीचे?तरुण कामगार पिढीचे भविष्य अंधकारमय आहे.आधीच नोकऱ्या घालवल्या आणि आता जे चांगले लोक पर्मनंट नोकरीला आहेत त्यांना बेरोजगार करण्याचा घाट *समजतंय ना देश कुठल्या मार्गावर चाललाय..?*
कंपनी मध्ये काम करणाऱ्यांनो बोंबला
सर्व प्रायव्हेट कंपनी मध्ये कामगारांना कमी फायदा आणि कॉन्ट्रॅक्टदारांचा मोठा धंदा सुरू करायचा निर्णय झालाय.पर्मनंट असेल तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट बेस वर कंपनी ठेऊ शकते तसे पूर्ण स्वातंत्र्य कंपनी ला दिले गेले आहेत यामध्ये कामगार अडचणी मध्ये येणार हे नक्की… *ज्यांना कुटुंबाची व पत्नीची व्यथा समजली नाही त्यांला कामगारांच्या व्यथा कशा समजणार..?*
राळेगनसिद्धीचे स्वयंघोषित गांधी उठले असतील तर त्यांना सांगा देशात हुक़ूमशाही लागू झाली आहे.मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रोज काहींना काही कामगार शेतकरी मजदूर विरोधी कारवाया करीत आहे.आपण सर्व असेच पहात राहिलो तर एक दिवस सगळेच त्या अदानी अंबानी चे गुलाम म्हणून रहायला भाग पडेल..लवकरच एक मोठया जन आंदोलनासाठी सर्वांना तयार रहावे लागेल…

कंपनी कर्मचा-यांना पगारवाढ, बोनस, भत्ते इत्यादी द्यावे लागतात. त्यांना निवृत्त होईपर्यंत कायम स्वरूपी नोकरीत ठेवावे लागते.नोकरीच्या काळात त्यांच्या नोकरीला काहीही बाधा पोहचत नाही.त्यांच्या कामगार संघटना असतात. ते आंदोलन करून कंपनीला व सरकारला जेरीस आणतात.ही भानगड ठेकेदारी कंञाटी पद्धतीत नसते. ते कमीत कमी मजुराकडून जास्तीत जास्त कामे करून घेतात.कमी मजुरी देऊन खर्च वाचवितात. खर्च वाचवून नफा कमावणे हाच त्यांचा उद्देश असतो. त्यांना नोटीस न देता अथवा कोणतेही कारण न देता वाटेल तेव्हा काढून टाकता येते.असे करताना कोणत्याही कायद्याची अडसर येत नाही. समान काम-समान वेतन हे तत्त्व लागू करण्याची त्यांना गरज भासत नाही. यामुळे कंत्राटीकरण ही पद्धत कंपनीमध्ये,सरकारच्या प्रत्येक खात्यात कमालीची फोफावली. कंपनी,नोकर भरती ठप्प झाल्याने बेरोजगारी सारखी वाढत गेली…!
या पद्धतीमूळे कामगारांचे जबरदस्त शोषण सुरू झाले.अशाप्रकारे मोठय़ा प्रमाणात ठेकेदारी कंञाटी पद्धत रूजविल्याने परंपरेने कामगार काम करणा-या मेहतर रोजगारावर गदा आला,कंपनी कामगारांना राबवून घेते. तसेच सुविधा देण्यास टाळाटाळ करते.त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे..पाच तीन वर्षापुर्वी कंपनीमध्ये तांत्रिक कामगार रोजंदारी बेसिसवर नेमल्या जात असे. त्यांना नंतर नियमितपणे कायम करण्यात येत होते. नंतर कंत्राटी पद्धत सुरू झाली.असे जवळपास ३५ हजार कामगार कंत्राटदाराकडे अत्यंत जोखमीचे काम तुटपुंज्या पगारावर करीत आहेत.अशा पद्धतीने ठेकेदारी अथवा कंत्राटी सेवेचा एक नवा पायंडा पडला असून, एक नवीनच वर्ग उदयाला आला आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात *लग्नाची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाही म्हणते’* अशी एक म्हण प्रचलित झाली आहे.नोकरी जाण्याची भीती सतत मनात बाळगत जगणे सोपे नाही. कंत्राटींच्या जगात हे असे जगणे आता नित्याचेच झाले आहे. या अस्थिर जगण्यातून जे अनेक प्रश्न उभे राहतात, त्यातल्या एकाशी संबंध दर्शवणारी ही म्हण अधोरेखित झाली आहे. यातूनच कंत्राटी जगाचे वास्तव समोर आले आहे. जे विवाहोत्सुक तरुण मुलं यात आहेत त्यांची लग्ने तुटतात. कंत्राटी नवरा अथवा जावई नको हीच अनेकांची इच्छा असते. तूटपुंजे वेतन,नोकरीचा भरवसा नाही, भविष्यात काय वाढून ठेवले याचा पत्ता नाही, असे विचित्र व अस्थिर जीवन या कंत्राटींच्या नशिबी आले आहे.जागतिकीकरणाचे हे दुष्ट परिणाम श्रमीक वर्गांना भोगावे लागत आहे. भांडवलदार वर्ग गब्बर होत चालला आहे. एका अहवालानुसार १० हजार रुपयांपेक्षा कमी पगार देशात ९२ टक्के महिला कामगार आणि ८२ टक्के पुरुष कामगार महिन्याला १० हजार रूपयांहून कमावतात, असे चित्र समोर आले आहे.सातव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे १८ हजार रुपये असायला पाहिजे. आज पण काही कंपन्यामध्ये नाही.. आज चौकीदार सात ते दहा हजारावर निमूटपणे कामे करीत असतांना आपण पाहतो आहे. कसे भागत असेल एवढ्या तुटपुंज्या पगारात ! मुलांचे शिक्षण,आरोग्य व कुटुंबाचा पालनपोषणाचा खर्च कसे भागवत असतील? कल्पनाच करवत नाही किती विदारक परिस्थिती या देशात श्रमीकांवर ओढवली आहे ! याचे हे एक जीवंत उदाहरण म्हणावे लागेल.

*एकीकडे करोडो लोक दुःख आणि दारिद्र्यात जगत आहेत,तर दुसरीकडे अदानी,अंबानी इतर लोक हे उद्योगपती देशात श्रीमंतीचा उच्चांक गाठत आहेत.* किती विसंगत परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे !
याशिवाय कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट राज्यकर्त्यांनी साध्य केली आहे. कामगार कायदा हा जर खरंच केंद्र सरकार अंमलात आणत असेल तर खूप अवघड परिस्थिती होणार आहे. अनेकजण विविध कंपन्यात पर्मनंट झालेले आहेत. त्यांना जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यात आले, तर त्यांना कधीही काढता येईल व तुटपुंज्या पगारावर त्यांना काम करणे बाध्य करतील. त्यामुळे अनेक घरे संसार उध्वस्त होतील.कित्येक जण बेरोजगार होतील.आता कामगाराचं काही खरं नाही.कामगारांसमोर आणखी काय काय वाढून ठेवले या सरकारने,तेच जाणोत !अमेरिकेत क्रुष्णवर्णीय लोकांच्या वरती अन्याय झाला त्यांच्या साठी गोऱ्या लोकांनी आंदोलने केली आणि सरकार ला माफी मागायला लावली ,इंग्लंड मध्ये कायद्यात बदल केला तर संपूर्ण लोक रस्त्यावर येऊन सरकारच्या पायाखालची जमीन हादरून टाकली..
आमच्या देशात बघा हििम्मत नाही
*कामगारांनो आता नाही तर कधीच नाही..*
कामगाराच्या आत्मसंरक्षणा चा प्रश्न असेल तर छत्रपती शिवराय महाराज, हक्क असतील तर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शांततेसाठी बुद्ध आणि जोतिबा बनायलाच लागेल.नाहीतर येणाऱ्या पिढ्या म्हणतील…

*आमचा बाप भित्रा होता | त्याने कामगारसाठी क्रांती साठी काहीच केलं नाही….*
पृथ्वी ही शेषनागाच्या फणी वर नसून ती कष्टकरी व श्रमीकाच्या तळहातावर आहे या देशाच्या विकासात ज्यांनी रक्ताचे पाणी केले अश्या माझ्या सर्व लढवय्या *कामगार* विरोधात जो केंद्रातील मोदी सरकारने कामगार विधेयक मंजूर केले अश्या विधेयकाचा मी निषेध करतो
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याऐवजी काढून घेतल्याशिवाय..
हर हर मोदी !!. घर घर मोदी !!
हे स्वप्न पूर्ण होणार नाही कंत्राटी कामगार कायदा.भक्तांचे पप्पा काँग्रेसच्या काळात नोकरीला लागले.! मेहनत केली आणि कायमस्वरूपी नोकरीला लागले.! आज नरेंद्र मोदी च्या कृपेने ते कंत्राटी कामगार झाले..
बंधू-भगिनींनो तुमच्या माझ्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी हा खूप मोठा धक्का आहे.मोदी आपल्यांना विकतोय पण मोदी नावाची पट्टी तुमच्या डोळ्यावर बांधली असल्यामुळे आज ते तुमच्या लक्षात येणार नाही.जेव्हा लक्षात येईल तेव्हा सर्व काही हातातून संपलेलं असेल..
*अब आय अच्छे दिन, अब बजाब टाळी और थयळी..गो कामगार गो….*
“एक कदम बेरोजगार की और”
ना सरकारी राहिल्या,
ना खाजगी ठेवल्या…!
सब बिक जायेगा,
सबका नंबर आयेगा
*हो आम्ही कामगार*
कामगार रक्ताचे पाणी करून कमवतो,म्हणूनच खायला भेटते.
कामगार वाचवा,,देश घडवा…

लेखक : संतोष शकुंतला आत्माराम बादाडे-पाटील

****       *****        *******

तात्काळ नियुक्ती करणे आहे —

संपूर्ण मुबंई सह महाराष्ट्रीतील सर्व शहरे, तालुके ,सर्व जिल्ह्यात पत्रकार , जाहीरात प्रतिनिधी व अन्य पदाधिकारी नियुक्त करण्यात येत आहेत , इच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा :

संपर्क : भारतराज पवार , मुख्य संपादक , 9158417131.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here