मराठा आरक्षण मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , माझा निर्णय ११ वाजता जाहीर करणार _मनोज जरांगे पाटील

0
146

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क : ९१५८४१७१३१

मुंबई आणि जालना : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसले असताना शांततेत उपोषणाचा चौथा दिवस पार पडला आणि आमरण उपोषणाला अचानक गालबोट लागला आणि पोलिसांनी नको तेच केले.बेछूट गोळीबार तर अमानुष लाठीमार ….उपोषणस्थळी एकच गोंगाट ,गोंधळ , चेंगरा चंगरी….. आणि मग महाराष्ट्र सरकारला नवव्या दिवशी जाग आली ती मराठा आरक्षण देणार लगेचच जीआर काढणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली.

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठीच घोषणा केली. मराठ्यांचा कुणबीत समावेश करून त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबत सरकारने निर्णय घेतला. मराठवाड्यातला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की , ज्यांच्याकडे निजामकाळातील महसूल नोंदी आहेत अशांना कुणबीचे दाखले देणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या संदर्भात दोन्ही जीआर आजच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. निजामांच्या काळापासूनची कागदपत्र ,मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्थिती, जुने रेकॉर्ड यांची पडताळणी समिती करणार. मराठवाड्यातील मराठा समाजातील बांधवांनी कागदपत्रे सादर करावीत या कागदपत्रांची पाच सदस्यीय समिती मार्फत पडताळणी करून मग त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल असे शिंदे यांनी सांगितले.कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी लगेचच दिले.

जालना येथे झालेली लाठीचार्ज ची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.त्याविषयी आम्ही खंत व्यक्त केली असून त्या प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत.मराठा समाजाविषयी आम्हास पूर्ण आदर आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही याविषयी दिलगिरी व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या आडून कुणीही राजकारण करू नये.असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आज ११ वाजता माझा निर्णय जाहीर करणार : मनोज जरांगे पाटील : दरम्यान अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे अशी विनंती केली.पुढे खोतकर म्हणाले मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा ( बुधवार) नववा दिवस आहे.मी आणि राजेश टोपे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात होतो दिवस भरातून जवळपास आमचे १० फोन झाले असतील ज्या मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन केले त्यातल्या बऱ्याचश्या मागण्या मार्गी लागल्या आहेत.उद्या ( गुरुवारी) सकाळी ११ वाजेची वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे.त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून उपोषण सोडण्याचा निर्णय घ्यावा .मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांच्या वतीने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतो.उद्या ( गुरुवारी) जरांगे पाटील उपोषण मागे घेतील असे खोतकर यांनी यावेळी विश्वासाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here