वासोळं: – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” –
२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती देवळा ग्रामीण रुग्णालय येथे मुरली केदारे संस्थेच्या वतीने कृष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरी करण्यातआली वैद्यकीय अधिकारी गणेश कांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुष्ठरोग समुपदेशक पी. वाय.देवरे यांनी कृष्ठरोगवरती मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष राहुल केदारे यांनी कुष्ठरोगाविषयी समाजाचे उत्तरदायित्व यासंदर्भात माहिती दिली आणि कुष्ठरोगाविरूध्द अखेरचे युद्ध या केंद्र सरकारच्या धोरणाचा संदर्भ दिला.यावेळी संस्थेचे कुष्ठरोग तज्ञ एस. एन. पवार, परिचारिका अर्चना अहिरे, मटाने येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पा केदारे,रामदास केदारे आदींसह देवळा ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


