शेतकऱ्यांच्या समस्या ” एसी ” त बसून नाही सुटणार ,कृषी विभागाने सक्तीने शेती केल्यास समस्या कळणार – कृषिमंत्री ना.दादा भुसे

0
20

 

वासोळं: प्रशांत गिरासे – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- महाराष्ट्र राज्य देशात कृषी अववल दर्जाचे राज्य आहे परंतु निसर्गाच्या लहरी पणा मुळे शेतकरी भरकटला जात आहे त्यांच्या समस्यांची जाण एसी त बसून नाही होणार अशी खंत ना.भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

इयत्ता चौथीपासून कृषी विषयाचा समावेश शिक्षणात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.  आम्हाला शेकडो किलोमीटर खेडयापाडयात बसलेला अन्नदाता शेतकरी व मंत्रालयात पडलेले अंतर कमी करायचे आहे. कृषी विभागाने देखील ज्ञान देण्याऐवजी एक-दोन एकर शेती करून ज्ञान घ्यावे असा उपरोधिक टोला कृषी अधिकाऱ्यांना ना.भुसे यांनी लगावला, कारण शेती करून पाहिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मूळ समस्या कळणार नाहीत असे  कृषीमंत्री ना. दादाजी भुसे म्हणाले.

कृषी व संलग्न क्षेत्रातील आव्हाने व संधी या विषयावर दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मा.मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांचा

कृषी क्षेत्र हा जिव्हाळ्याचा विषय आहे.आम्ही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेत आहोत. कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा दिला जात आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या तरुणांना नव्या रोपवाटिका योजनेचा फायदा दिला जाईल. शेतकर्यांना समाधानाचे दिवस आणण्यासाठी यापुढेही उपक्रम राबविणार आहोत, असे मंत्री ना. भुसे यांनी संवाद कार्यक्रमाप्रसंगी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here