प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात टीव्ही… चला टिव्हीलाच करूया मतदान मिळवूया वॉर्ड विकासाचा खरा बहुमान !

0
303

देवळा / माळवाडी : होमपीच :  तालुक्यातील माळवाडी, फुलेमाळवाडी आणि मेशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची हवा सकाळच्या गुलाबी थंडीत गरम झाल्याचे अनुभवास मिळते आहे.जोरदार प्रचार मोहीम राबविली जात आहेच.आणि ती राबविली सुद्धा जातेच हे सुज्ञ मतदारांना सांगणे न लगे.का ? ज्याच्यात विकास कामे करण्याची धमक नसते तो सुद्धा मी विकास कामे करून दाखविणार तुम्ही मलाच निवडून द्या.अरे हो तुझ्यात विकास कामे करून दाखविण्याचे गट्स आहेत का ? हे आधी तू पहा.मतदार आता सुज्ञ झालाय. तो दूध खुळा वाटला काय ? मतदार दूध खुळा नाही . अशीच अवस्था आमच्या माळवाडी गावातील विरोधक उमेदवारांची आहे.वॉर्ड क्रमांक तीन मध्ये साधारणतः गेल्या २५ वर्षांपासून सद्या उभ्या असलेल्या माझे विरोधकांच्या भाऊबंदकी कडे सत्ता होती.त्यांनी आजपर्यंत कोणता विकास केला ? हे मतदारांनी हककाने त्यांना विचारणे गरजेचे आहे.फक्त वॉर्डातील रस्ता केला याच्या पलीकडे काहीही नाही.२५ वर्षात फक्त रस्ता करून दाखविला हा काय मोठा विकास होत नाही.आणि गेली दीड वर्ष माझे विरोधकांचे जेठ ग्रामपंचायतीचे सदस्य झाले काही महिने उपसरपंच होते तेव्हा त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला तो म्हणजे वॉर्डातील समाज मंदिर सगळ्याच्या कार्यक्रमासाठी उपयोगात येणारे समाज मंदिर आज त्या समाज मंदिरावर गड्याने कब्जाच करून घेतला.त्या समाजमंदिरात आजही यांचे सामान पडले आहे.त्या समाज मंदिरावर फक्त यांचाच हक्क यांनीच ठेवलाय.इतकी दहशत यांनी वॉर्ड तीन मध्ये ठेवली हे योग्य नाही.मग पुढे हे काय विकास करणार हे तर सगळ्या रहिवाशांवरच कब्जा करून घेणार अशी यांची वागणूक आहे.

म्हणून सांगतो वेळ गेलेली नाही हिच वेळ आहे त्याला त्याची जागा दाखवण्याची वॉर्ड क्रमांक तीन मधील माझ्या आई बापांनो जागे व्हा,निर्भिड बना आपली सुसंस्कृत , सोज्वळ, बोलण्यात गोडवा आणि विकास कामे करून दाखविणार असे माणसं आपणास या निवडणुकीत मिळाल्याने ते उमेदवार सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार ह्या आहेत.यांची निशाणी टीव्ही ( दूरदर्शन ) आहे हे आपणास सगळ्यांना माहीत आहेच.असा प्रत्येकाचा मनामनात आणि प्रत्येकाच्या घरा घरात असणाऱ्या टिव्ही लाच निवडून द्या.मतदानास जाताना टिव्ही चित्रा समोरीलच बटन  दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.असे आवाहन प्रख्यात शिवव्याख्याते यशवंत ( मिथुन )गोसावी ,संतोष जाधव, सुरेश बागुल, भारत पवार, खंडू डांबरे , महादू बागुल, प्रमोद पवार यांनी वॉर्डातील मतदारांना भेटून केले आहे.

मतदारांनी बराच प्रतिसाद दिल्याने वरील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.टिव्ही लाच मत तर वॉर्ड क्रमांक तीन च्या विकासाला मत आहे टिव्ही निवडून आल्यास तर आपल्या वॉर्डातील विकास पर्व आणून भविष्यात तुम्हास तुमच्या नातवांना , मुलांना नक्कीच चांगले दिवस येणार तुम्हास समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तुमच्या साठी आणि तुमच्या मुलांसाठी बरेच काही विकासकामे आम्ही करून दाखविणार आहोत.म्हणून आपल्या घरात ,आपल्या मनात असू द्या टिव्ही ,लक्ष ठेऊन बटन दाबा टिव्हीचे ,निवडून आणा टिव्ही लक्ष गाठा वॉर्ड विकासाचे असे आवाहन प्रख्यात शिवव्याख्याते यशवंत गोसावी , पत्रकार भारत पवार यांनी यावेळी सांगितले.आता कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका २५ वर्ष सत्तेवर राहून वॉर्ड विकास केला नाही सत्तेवर असताना मंगलकार्यालय बांधले गेले नाही आता काय बांधणार उलट समाज मंदिर बळकावले गेले. अशा समाज मंदिर बळकावून बसलेल्यांना पुन्हा बळी पडू नका असे आवाहन करून टिव्ही चे बटन दाबून आपले  बहुमूल्य मत देऊन प्ररचंड मतांनी विजयी करून आपल्या वॉर्ड क्रमांक तीन च्या वॉर्ड विकासाला चालना देऊन वॉर्ड विकासाचा बहुमान मिळवा.असे पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत पवार यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here