मालेगावी रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे ! अधिकारी लक्ष घालतील का वरिष्ठ दर्जाचे ? – मागणी

0
65

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक.                     निर्भिड , रोखठोक , निर्णायक बातमी व जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१

 

मालेगाव : बातमी भाग – १ – कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मोची कॉर्नर जवळील शिवाजीवाडी येथे रहदारी सिमेंट रस्त्याचे  काम सुरू असून रस्त्याच्या निकृष्ट कामा विषयी येथील नागरिकात चर्चेला उधाण आले आहे तर कॉन्ट्रॅक्टर सागर अग्रवाल, दादा इंगळे यांनी याकामी सिमेंट ऐवजी जनतेच्या वापरात येणाऱ्या रस्त्याच्या कामात चांगलाच चुना लावून आपले चारो उंगलीया घी में डूबा के सर कढई में असा प्रकार  चालविल्याने येथील नागरिकात नाराजी पसरली आहे.

याबाबत महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधीने सदर काम चालू असताना भेट दिली असता हा भयानक प्रकार पाहून आश्चर्य वाटले.मात्र संबंधित ठेकेदारांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास मात्र टाळाटाळ केली.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात बोलायचे झाले तर सदर रस्त्याच्या कामात बराचसा मुंबई हात मारल्याचे दिसून येते. या रस्त्याच्या कामात जुना रस्ता डांबरीकरण असलेला रस्ता नियमा नुसार खोदून अर्थात खोल करण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे  ह्या कामात दगड , डबर टाकलेली नाही त्यावरून रेती किंवा कच वापरलेली नाही फक्त काम चालू करून सिमेंट , बारीक खडी यांचा वापर करून वरून सिमेंटचा वापर करून चालू काम करण्यात येत आहे. शासनाचा असलेला भरगोस निधी हपापाचा माल गपापा करणे आणि रस्ता बनविणे  येवढेच ध्येय सदर ठेकेदारांनी ठेवले असून रस्ता बनविताना शासनाचे नियम धाब्यावर ठेऊन ठेकेदारांनी आपल्याच मर्जीने काम चालविले आहे.त्यामुळे या कामात पारदर्शकता आढळत नसून सदर कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी तसेच शहरी वस्तीत असल्या कारणाने आयुक्त जाधव मनपा मालेगाव यांनी सदर बातमीची दखल घेऊन हे काम बंद करून झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा पत्रकार भारतराज पवार यांनी केली आहे. गुणवत्ता नियंत्रण दक्षता विभागामार्फत सुद्धा चौकशी करण्यात येऊन गुणवत्ता नियंत्रण दक्षता विभागामार्फत तसे प्रमाणपत्र घेण्यात यावे तरच सदर ठेकेदारांचे या कामाचे चेक काढण्यात यावे अशीही मागणी भारतराज पवार यांनी यावेळी केली आहे.

विशेष म्हणजे सदर रस्त्याच्या मध्यभगी चेंबर ठेवले असून सद्या सर्वच चेंबर मोकळेच आहेत. चेंबरचे पक्के बांधकाम न करता वरून उघडेच असल्या कारणाने रात्री अपरात्री अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तर रस्त्यावर लहान मूल खेळताना त्यात पडण्याची भीती अधिक असल्याने याबाबत ठेकेदारांनी स्वतःची भूमिका सध्यातरी बिनधास्त ठेवली  आहे .जर अपघात घडलाच तर याची जबाबदारी ठेकेदारासह संबधित शासकीय अधिकारी घेणार काय ? असा सवाल चर्चिला जात आहे.

विशेषतः रस्त्याचे अर्ध काम सदर महाशयांनी पूर्ण केले असले तरी रस्त्याच्या ( प्रवेश करताना) डाव्या बाजूला येथील किराणा दुकाना समोरील रस्त्याचा पुढचा काही भाग सोडून त्या ठिकाणी काही वाया गेलेले मटरेल सोडून येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठी अडचण तर केलीच शिवाय घाणीचे साम्राज्य तयार करून ठेवले आहे.त्यामुळे सदर ठेकेदारांच्या बेफिकिरीचा अनुभव किराणा दुकानदार , येथील रहिवाशी यांना येतो आहे.तर किराणा दुकानासमोरील रस्त्याचा काही भाग सोडून पुढील रस्त्याचे काँक्रिटीकरण उरकविण्यात आल्याने येथील दुकानदारांनी दुकानासमोर असलेल्या रस्त्याचा अर्धा भाग सोडून देऊन लगेच पुढच्या भागाचे कॉंक्रिटीकरण करून टाकले मग हा भाग का सोडला ? याचे उत्तर सदर ठेकेदारांनी न देता दीपावलीच्या सिजन मध्ये उर्वरित काम मंजूर करून ते करण्यात येईल असे विश्वास न बसणारे उत्तर संबंधित ठेकेदारांनी दिल्याचे किराणा दुकान मालकांनी यावेळी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. असे जर असेल तर मग उर्वरित रस्त्याचे काम मध्येच कसेकाय करण्यात आले ? रस्ता बनविताना रस्त्याची डावी व उजवी बाजू कुठेही खंड न पाडता तात्काळ बनविले जाते मग ह्या महाशयांनी किराणा दुकाना समोरील डावी बाजू अर्धी सोडून पुढे मध्येच कसेकाय करण्यात आली ? त्यामुळे अधिकच भ्रष्टाचाराची शंका निर्माण झाली असून याबाबत तात्काळ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी चौकशी करणे आवश्यक असल्याचे भारतराज पवार यांनी म्हटले आहे.

याबाबत लवकरच गुवत्ता नियंत्रण दक्षता अधिकारी, मनपा आयुक्त जाधव, साबा कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे पत्रकार पवार यांनी सांगितले असून मंगळवार पासून या रस्त्याच्या कामाची चौकशी न लागल्यास पुढील बातमी भाग दोन मध्ये वाचा –  भ्रष्टाचारास खतपाणी घालणारे अधिकारी ! जनता आमचे काय वाकडे करी ? सबको बाटना पडता यालाच म्हणतात ठेकेदारी …. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here