
माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार फेरीचा काल शेवटचा टप्पा पूर्ण केला असून वॉर्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी आपणास चांगलाच प्रतिसाद दिल्याने मी माझ्या मतदार माय बापांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखविणार असे वचन मी यानिमित्ताने सर्वच मतदारांना देते आहे. जर दिलेले वचन मी पूर्ण करू नाही शकले तर राजकारणातून कायमची माघार घेणार असे ही वचन वॉर्ड क्रमांक ३ ( तीन ) च्या उमेदवार सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार यांनी दिले.
ज्यावेळी प्रचाराच्या निमित्ताने मी वॉर्ड क्रमांक तीन फिरले तेव्हा मला अनेक समस्या दिसून आल्याने याचे आपणास खूपच वाईट वाटते आहे.तर माझे सासरे भारत पवार , पती प्रमोद पवार आणि आमचे काही सहकारी यानिमित्ताने वॉर्ड क्रमांक तीन मध्ये फिरण्याचा अनुभव घेतला त्यांनी वॉर्ड क्रमांक तीन मधील परिस्थिती त्यांना खूपच वाईट दिसली तर माळवाडी गावातील तसेच मळ्यातील रहिवाश्यांना आरोग्य सेवा तात्काळ मिळावी रात्री ,अपरात्री आजाराशी भयंकर सामना करावा लागतो त्यावेळी खूपच हाल होत असतात अशा वेळी गावातच लहान दवाखाना असणे खूपच गरजेचे असल्याचे भारत पवार यांनी यावेळी सांगितले. यासाठी वॉर्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी टीव्ही ( दूरदर्शन ) समोरील नंबर दोन चे बटन दाबून प्रचंड मतांनी सुरेखा प्रमोदकुमार पवार यांना निवडून देऊन वॉर्ड क्रमांक तीन मधील तसेच गावातील नागरिकांना सुविधा पुरविण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन भारत पवार,प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले.
बटन दाबा टीव्ही निशाणी नंबर दोन चे वचन देते मी विकास कामांचे : माझा वचन नामा –
१) दर्जेदार व उच्च शिक्षणासाठी वॉर्ड क्रमांक तीन मधील रोहिदास वस्तीतील मुला मुलींचे शिक्षणाचे ज्ञान वाढविण्यासाठी त्यांना अभ्यासाकरिता स्वतंत्र रूमची व्यवस्था करणार .
२) मुला मुलींसाठी कॉम्प्युटर ( संगणक ) उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
३) समाज मंदिर भव्य दिव्य बांधण्यासाठी प्रयत्न करणार.
४) वॉर्डातील गरजू निराधार व वयोवृद्धांसाठी पेन्शन चालू करणे , श्रावण बाळ, शबरी योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे .
५) माळवाडी शेवाळे वस्ती , नव्या मळ्यातील तसेच नामदेव वाडीतील खैरनार वस्ती खोऱ्यातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न.
६) जन हिताच्यादृष्ठीने गावातील नागरिकांना , महिलांना , वयोवृद्धांना रात्री अपरात्री आरोग्य सेवा तात्काळ मिळावी यासाठी गावात मिनी आरोग्य उपकेंद्र / दवाखाना उभारण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार.
७) क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार.तसेच
८) रोहिदास वस्तीत संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा पुतळा बसविण्याचा मानस.
९) जनसेवा उपक्रम राबविणार.
यासाठी वॉर्ड ३( तीन ) मधील माझ्या मतदार माय बापांनी आपले बहुमूल्य मत वाया जाऊ न देता आपल्या टीव्ही निशाणी समोरील नंबर दोन चे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा.आणि मी दिलेले वचन पूर्ण करण्या साठी हातभार लावा.असे आवाहन सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार, प्रमोद पवार यांनी यावेळी केले आहे.यानिमित्ताने सुरेशनाना बागुल , संतोष जाधव, निंबा खैरनार , शांताराम बच्छाव ,महादू बागुल आणि अनेक मित्र परिवार यांनी टिव्ही निशाणी असलेले नंबर दोन चे बटन दाबून टिव्हीलाच मतदान करून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
