मानवाधिकार संघाच्या जिल्हा प्रमुख पदी सौ.मंजुषा जगताप यांची नियुक्ती

0
54

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.९१५८४१७१३१

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _

मानवसेवा आणी मानव अधिकार हननावर कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था मानवाधिकार सहायता संघ – भारत या संस्थेच्या नाशिक जिल्हा महिला प्रकोष्ठ पदी सौंं.मंजुषा जगताप नाशिक यांची नुकतीच निवड झाली.सौ.जगताप यांचे आत्तापर्यतचे मानवहित आणी सामाजीक कार्य बघता राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.सोनु सिंह जी यांचे आदेशानुसार प्रदेश प्रमुख श्री.कल्पेशजी व्यास,प्रदेश अध्यक्ष श्री.रवी धारणे तथा प्रदेश महिला प्रभारी सौ.हेमलता धारणे यांच्या स्वाक्षरीने सौ.जगताप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.रवीवार दि.८ रोजी झालेल्या छोटेखानी समारंभात श्री.सागर कर्पे जिल्हा प्रमुख नाशिक यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्यकारी मंडळासहीत सौ.शिल्पाताई झारेकर,सौ.मेघा शिंपी,सौ.नंदिनी अहिरे,सौ.संध्या मराठे सहीत अन्य महिला उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here