भाजपच्या उमेदवार डॉ भारती पवार विरुध्द माळवाडीत संताप , कमळ कोमजनार ?

0
52

भारतराज पवार :  मुख्य संपादक                             लोसभा निवडणुकीच्या संपूर्ण मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातील प्रत्येकाच्या मनामनात तुमचे कार्य वाचून मतदारांत तुमचे स्थान निर्माण करण्यासाठी ” महाराष्ट्र न्यूज” शी संपर्क करा. मो.९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार धूम सुरू असून नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील शेतकऱ्यांनी व तरुणांनी भाजपचे उमेदवार डॉ.भारती पवार यांचे विरुद्ध जोरदार संताप व्यक्त केला आहे.तर येथील सरपंच व उपसरपंच मयुर बागुल व सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून भाजपच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांना गावात प्रवेश करू द्यायचा नाही आणि त्यांना मतदान सुद्धा करायचे नाही असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.त्यामुळे माळवाडीत कमळ कोमजनार ? असे चित्र निर्माण झाले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ.भारती पवार ह्या केंद्रात राज्य आरोग्य मंत्री असताना गेली पाच वर्षे माळवाडी , फुले माळवाडी गावांना भेटी न देता येथील शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा त्यांनी आजतागायत जाणून घेतल्या नाहीत.गेल्या पंचवार्षिक मध्ये येथील शेतकऱ्यांनी , तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना मतदान केले होते. हिच का त्यांनी येथील जनतेची जाणीव ठेवावी काय ? निवडून येऊन मंत्रीपद पदरात पाडून घेतले आणि हुरळून गेले असे की पुन्हा माळवाडी आणि फुले माळवाडी येथील नागरिकांकडे मत मागण्यास जाणारच नाही अशा आविर्भाात राहून येथील जनतेच्या अपेक्षांचा त्यांनी चुराडा केला.त्यामुळे डॉ.पवार यांचे विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी करून कांदा पीक मातीमोल करून शेतकऱ्यांना जिवंतपणीच मारण्याचा प्रकारचं केल्याने त्यामुळे सुद्धा संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले असता मोदी सरकारला पाझर फुटला नाही.कांद्याचे भाव कमी केले, निर्यात बंदी उठवली नाही त्याचप्रमाणे महागाई गगनाला भिडल्याने सगळ्या नागरिकांना जीवन जगणे नकोसे करणारे मोदी सरकार जनतेच्या विश्वासाला काळे फासले असे परखड मत पत्रकार भारतराज पवार यांनी व्यक्त केले.तर जनहिताच्या दृष्टीने डॉ.भारती पवार यांनी केंद्र सरकार कडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडून शेतकरी हित साध्य करण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठविण्या साठी प्रयत्न करणे गरजेचे होते ते सुद्धा त्यांनी केले नाही.त्याचप्रमाणे केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री असताना माळवाडी , फुले माळवाडी गावातील कोणी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला त्यांचे कडून सहकार्य लाभले नाही त्यामुळे अशा भाजपच्या उमेदवार असलेल्या डॉ.भारती पवार यांनी स्वतःच्या तुमडी वाजविण्या पलीकडे काय केले ? असा संतप्त सवालही येथील संतप्त नागरिकांनी केला असून माळवाडी आणि फुले माळवाडी येथे येण्यास डॉ.भारती पवार यांना शेतकऱ्यांनी मज्जाव केला असून त्यांनी ह्या गावी मत मागण्यास येऊ नये आता आम्हीच ठरवणार कोण लायकीदार उमेदवार ? त्यालाच आम्ही मतदान करू.मात्र डॉ.भारती पवार यांनी ह्या गावी फिरकू सुद्धा नये .असेही संतापजनक सुर येथील नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी व्यक्त केला आहे. तर देवळा येथील आर.पी.आय.चे कार्यकर्ते सुद्धा डॉ.भारती पवार यांचे विरुद्ध नाराज असून डॉ.पवार यांचे कार्य म्हणजे नागरिकांना झुलवत ठेवणे.जनतेच्या समस्यांना प्राधान्य न देता खाली वल्गना करणे एवढेच आहे.त्यामुळे देवळा , माळवाडी आणि फुले माळवाडी गावी कमळ कोमजणार की काय ? अशी अवस्था निर्माण झाली आहे.

उद्या वाचा : धुळे लोकसभा मतदार संघ _ भाजप उमेदवार दिशाहीन तर काँग्रेस चे उसना उमेदवार जनतेत नाराजी , डॉ.तुषार शेवाळे बंडखोरी करणार , कोण तारणार आणि कोण मरणार ? 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here