कांदिवलीत आद्य क्रांतिकारक म.ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

0
22

 

मुंबई : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क: संजय बोर्डे : 
आद्य क्रांतिकारक, स्त्री शिक्षणाचे जनक, मुलींसाठी भारतामध्ये पहिली शाळा काढणारे, आपल्या पत्नीस उच्चशिक्षित करून मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक बनवणारे ,दीनपददलितांचे कैवारी ,बहुजन उद्धारक, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वप्रथम शोधून काढणारे ,छत्रपती शिवरायांवर पोवाडा लिहिणारे, खरेखुरे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती नालंदा बुद्ध विहार भीमनगर दामुनगर कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणि सर्व उपासक उपासिका यांच्या वतीने साजरी करण्यात आली. भंते कश्यप यांनी धम्म वंदना घेवून जयंती ची सुरुवात केली. यावेळी
शिवराम काळे यांनी तथागत भगवान बुद्ध यांना पुष्प वाहिले, बापूराव चव्हाण यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्प अर्पण केले,भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा सुदामती खोपे व लक्ष्मण रेड्डी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला.सदर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरामण जाधव यांनी केले.यावेळी बबन खरात ,नामदेव चव्हाण ,निशांत मोरे, मच्छिंद्र डावरे ,पत्रकार संजय बोर्डे, बापूराव चव्हाण, रवि साळवे, तात्याराव तांभारे, रवि हिरवे निशांत मोरे यांच्यासह अनेक महीला पुरुष , बालक उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here