भावभावनांच्या अविष्कारनाची एक “खासियत”असते : रविराज सोनार

0
41

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार – मुख्य संपादक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१              मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  – प्रत्येक शहराला स्वत:चा चेहरा असतो, स्वत:चे एक मन असते. भावभावनांच्या अविष्कारणाची एक ‘खासियत’ असते. त्यामुळे प्रत्येक शहराला वेगळेपण असते. बाहेर मालेगाव कुख्यात म्हणून गणले जात असले, तरी सामाजिक सलोख्याचे आणि सौहार्दाचे गाव आहे, असं इथला रहिवासी ठामपणे सांगतो. महाराष्ट्राचे मॅंन्चेस्टर म्हणून ओळखले जाणारे हे गाव वस्रांच्या ताण्या- बाण्याप्रमाणे हिंदू- मुस्लीम तसेच सर्वधर्मियांचे गाव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व माध्यम अभ्यासक रविराज सोनार यांनी येथे केले.
कॅम्प जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुरु असलेल्या पुरुषोत्तम ठाकूर गुरुजी स्मृती निमित्त ‘अक्षय व्याख्यानमालेतील ७ वे पुष्प गुंफताना ‘अनोखे मालेगाव’ याविषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे, उपाध्यक्ष भगवान बागूल, कोषाध्यक्ष शामलाल रोहिदास विचारमंचावर आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी श्री सोनार पुढे म्हणाले की, मालेगावची नोंद खरे तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी घ्यायला हवी होती, परंतु दुर्दैवाने ती घेतली गेली नाही. हे सांगताना त्यांनी मालेगाव नावाची व्युत्पत्ती पासून शहराचा ऐतिहासिक वारसा मांडला. मालेगावविषयी अनेक किस्सेही त्यांनी सांगितले. युगद्रष्टा राजर्षी सयाजीराव गायकवाड, आद्य शिक्षणप्रवर्तक फातिमा शेख, नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचे पासून सुनिताबाई देशपांडे, डॉ म. सु. पाटील, शिरिष कणेकर आदी दिग्गजांचे येथे वास्तव्य होते, याबाबत त्यांनी गौरवाने उल्लेख केला.
मोगल काळात खानदेशची राजधानी ब-हाणपूर होती, त्यावेळी मालेगाव खानदेशचे प्रवेशद्वार होते, त्यामुळे इतिहासात मालेगावचा उल्लेख ‘कलीद- ए- खान्देश’ अर्थात खानदेशची किल्ली असा केला जातो, अशी माहितीही श्री. सोनार यांनी देतांना मालेगावचे भौगोलिक महती सांगितली.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भगवान बागूल यांनी ‘जगणे समजून घेतांना’ याविषयी प्रास्ताविक केले. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन किती आवश्यक आहे, याबाबत विवेचन केले. भगवान बागूल यांनी अतिथी परिचय करुन दिला, डी आर हिरे यांनी आभार मानले. यावेळी अनैक जेष्ठ नागरिकांसह रसिक श्रोते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here