पाठ्यपुस्तके दान करण्याचे आश्रय आशा फाउंडेशन संस्थेच्या वतीने आवाहन

0
21

भारतराज सिताताई पांडुरंग पवार : मुख्य संपादक.     ” निवडणुकीची धमाल आमच्या बातमीची कमाल” लोकसभा मतदार संघ मोठा, सर्वच मतदारा पर्यंत आपण पोहचू शकू याची खात्री कमीच.म्हणून आपल्या सर्वच मतदारापर्यंत काही सेकंदात पोहचून मतदारांच्या घराघरात आणि त्यांच्या मना मनात राहण्या साठी आम्हास संपर्क करा. संपर्क : ९१५८४१७१३१

मालेगाव : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क – जिल्ह्यातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने मोफत शालेय पाठ्यपुस्तके पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ह्या उपक्रमात गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याचा एक हेतू आहे. ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ संपलेल्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय पाठ्यपुस्तके आमच्याकडे मोफत जमा करून ज्ञानदानाचे अनमोल कार्य करावे व नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शैक्षणिक संस्थांना , फाऊंडेशनना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी मदत करावी असे आवाहन स़ंस्था अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत व सचिव आशाताई बच्छाव यांनी केले आहे. सध्याची वाढती महागाई बघता सध्याच्या शैक्षणिक खर्च हा त्या गरीब गरजू व शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना असाह्य आहे व शालेय गणवेश, वह्या , मार्गदर्शक तसेच नवनीत व्यवसाय ह्या सर्व गोष्टी प्रत्येकी १०००/- रूपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटलीसाठी हातभार लावण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. आणि हीच खरी आदरांजली महाराष्ट्राचे आराध्यदैवत व स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिक्षणाचे महामेरू परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना राहील. असे राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.
*पत्ता :- आश्रयआशा फाऊंडेशन कार्यालय मु.व-हाणे पो.सोनज ता.मालेगाव जि.नाशिक*
संपर्क क्रमांक:- ९८५०४४७६८५/९६८९५१९०९४ किंवा इमेल आयडी:- yuvamarathanews2003@gmail.com

व ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीचे पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे त्यांनीही आपली नावनोंदणी करावी. आमच्याकडे पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ते विद्यार्थ्यांना देऊ. असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here