इतिहास : शिवाजी महाराज आणि मुस्लिम बांधव

0
26

संपर्क : लोकसभा निवडणूक मतदारसंघ मोठा तरी सुद्धा कमी वेळात जास्तीतजास्त मतदारांच्या घराघरात आणि मनामनात पोहचा अगदी काही सेकंदात. संपर्क मो. ९१५८४१७१३१

मुंबई : कटा.टाइम्स महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संजय बोर्डे – 
शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नुर खान शिवाजी महाराजा बरोबर आग्रा ला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील.काजी हैदर शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव, मीर मोहम्मद शिवाजी महाराजांना अफजलखानाचा वध करण्यासाठी वाघ नखे पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हा सुद्धा मुसलमान बॉडी गार्ड मुसलमान , जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तर मुसलमान शिवाजी महाराजांचे शत्रू कसे तर मग शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात का? शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुस्लिम होते. शिवाजी महाराजांनी एकही मशीद पाडले नाही किंवा एकही कुराण जाळले नाही .याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. रायगड किल्ला राजधानी झाल्यावर त्या ठिकाणी जगदीश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी विचारले की जगदीश्वराचे मंदिर तर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकासाठी मशिद कुठेआहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा मशिदी साठी दाखवली. आणि तेथे मशीद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजाला पुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चितच नाहीशी होईल .अफजलखानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर पोहोचले. जिजाऊंनी विचारले अफजल खानाचे काय झाले ?महाराज उत्तरले अफजलखान मारला गेला जिजाऊंनी विचारले त्याचे प्रेत कुठे आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी नंतर काय म्हणाले असतील जिजाऊ? शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफजल खान संपला आता वैर संपले तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफण कर व तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध. शिवरायांनी अफजलखानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्यागडाच्या पायथ्याशी दपन केले तेथे त्याची कबर बांधली.१६ व्या शतकात शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्रात एक तारा चमकला. जिजाऊ च्या पोटीं सिंह जन्मला पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला. ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला.  हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखला पाहिजे.आपला राजा कुठल्या धर्म किंवा जातीविरुद्ध नव्हता तो फक्त अन्यायविरुद्ध होता हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

शब्दांकन – शोध पत्रकारिताचा बादशहा लोकनायक संजय बोर्डे  8652274580

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here