बॅरिस्टर ,विश्वरत्न तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ग्रामस्थांतर्फे पूजन

0
24

भारत पवार : मुख्य संपादक                                    आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क  – ९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क. – देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत व गावातील तरुण आणि ग्रामस्थांतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बॅरिस्टर , विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रयतेचे राजे शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध , विश्वरत्न तथा भारतरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महिला शिक्षणाचे जनक , क्रांतीसूर्य म.फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्प हार अर्पण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच मयुर बागुल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटना याविषयी थोडक्यात माहिती दिली.तर ग्रामसेवक संभाजी देवरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रम येथील सभा मंडपात आज सकाळी आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी उपस्थित असलेले डावी कडून जेष्ठ नागरिक बापू शेवाळे, तुळशीराम बच्छाव , जिभाउ शेवाळे , भगवान बच्छाव , ग्राम. प. सदस्या हर्षाली बच्छाव , पोलीस पाटील सौ.वाघ , उपसरपंच मयुर बागुल, सुनील वाघ , संजय खैरे , खुशाल पवार ,प्रमोदकुमार पवार , दादाजी तानाजी शेवाळे ,अनिल बागुल ,ग्रामसेवक संभाजी देवरे, सभामंडपाच्या स्टेज समोर खाली बसलेले बापू अहिरे , ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे अन्य तरुण तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here