जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१
मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सद्या सर्वत्र पाण्याची टंचाई असल्यामुळे तहान भागवण्यासाठी जंगलातील प्राणी गाव मळ्यात येऊ लागले त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणनार यात शंकाच नाही.परंतु असाच काहीसा धाडसाचा प्रकार मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथील शेतकरी असलेल्या कुटुंबात घडला. गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णराव ठाकरे शेतात गेले असता मुलांशी खेळताना एक मांजरीच्या पिला सारखे पिलू दिसले ते बिबट्याचे ( वाघ) पिलू होते. त्याला मांजरीचे पिलू समजून मुलांनी घरी आणले त्याचा प्रेमाने सांभाळ ह्या शेतकरी कुटुंबाने केला. त्याला अत्यंत मायेने दूध पाजले. घरातील मोठ्या व्यक्तीने जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आले की हे मांजरीचे पिलू नाही तर बिबट्याचा बछडा आहे त्याची आई त्याला घ्यायला येईल या अपेक्षेने तो शेतकरी काही दिवस रोज त्या बछडास शेतात चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवत.परंतु त्या बछडाची आई ( वाघीण ) तिकडे फिरकलीच नाही .शेवटी कंटाळून ठाकरे यांनी मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांना कळवून त्या पिलाची रवानगी वनविभागाकडे केली.आणि ठाकरे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.