शोध आणि बोध : बंद पाळल्याने होईल का हो कोरोना चा वध ? हे सगळ थोतांड का करता ? का स्वतःच्या पायावर आणि दुसऱ्याच्या ही पायावर कुऱ्हाड मारता ? शासनाने आणि नेत्यांनी शोध आणि बोध घेण्याची गरज_ भारत पवार

0
39

(वरील फोटो _ मा. भारत पवार _ मुख्य संपादक /संचालक _ क स मा दे टाइम्स”  महाराष्ट्र न्यूज ” तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती , आणि नासिक” जिल्हा कार्याध्यक्ष ” _ माहिती अधिकार का.महासंघ , मो. 9158417131 ,) 

नासिक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ” विशेष लेख ” _ गेल्या वर्षी कोरोना महामारी मुळे दि. 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशात लॉक डाऊन झाले होते.आणि परिस्थिती आवाक्यात आली.परंतु कोरोना ह्या महामारी चा पूर्णतः खात्मा झालेला नव्हता पण काहीसे वातावरण निवळले होते ,असे जरी असले तरी आर्थिक चक्र पूर्णतः बारगळले गेले होते . लहान व्यापारी ,नोकरदार ,मध्यमवर्ग यांची तर गाडीच घसरली होती तर हात मजूर, गरीब यांच्या खाण्यापिण्याच्या खूप अवकळा झाल्या होत्या. तर महाराष्ट्र शासनाची आर्थिक घडी पूर्णतः उचकलेली होती आणि तीच आर्थिक घडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्यवस्थित करता करता सन 2021 उजाडले आणि नवीन वर्षात व्यवहारही काहीसे सुरळीत चालू होते .परंतु करोना महामारी जनतेचा पिच्छा सोडण्यास तयार नाही याला कारण जनतेचे बेपर्वाईने वागणे किंवा नागरिकांचा निष्काळजीपणा म्हणा त्यामुळे करोना अधिकच पसरू लागला आहे. आणि पाहता पाहता फेब्रुवारी 0 21 मध्ये करोना महामारी ने उग्र रूप धारण करून होत्याचे नव्हते केले आणि मार्च महिन्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेत नाशिक जिल्हा देशातील रुग्णवाढीतील टॉप टेन जिल्ह्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. याला कारण नागरिकांची बेपर्वाई नागरिकांचा अडेलतट्टूपणा यासाठी औषध म्हणजे लॉक डाउन करणे किंवा बंद पाळणे असे नाही. का बंद पाळावा बंद पाळून आर्थिक चक्र पूर्णतः कोलमडते ,मोल मजुरी वाले ,लहान व्यवसायिक, हात मजूर ,गरीब तर नोकरदार वर्ग मध्यमवर्गीय व्यापारी यांची खूपच पिळवणूक होते बंद करून फलित काय मिळते ? हे प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक नेत्याने एकांतात बसून विचार करणे गरजेचे झाले आहे .बंद करणे म्हणजे स्वतःच्या पायावर आणि दुसऱ्या च्या ही पायावर कुऱ्हाड मारून देणे आणि कोरोणा महामारी स आणि उपासमारी उत्तेजन देणे असे म्हणणे योग्य होईल याचे कारण बंद जरी पाळला मग तो दहा दिवसाचा असो किंवा महिन्याभराचा असो किंवा चार_ सहा महिन्याचा असो याने कोरोणा महामारी मागे हटणार तर नाहीच परंतु जनतेचा पिच्छा सोडणार ही नाही .मग का बंद करायचा ? का बंद पाळावा ? का उपासमारी ओढून घ्यायची आणि स्वतःचा आणि दुसऱ्याचाही  जीव धोक्यात का घालायचा ? अहो बंद पाडून कोरोणाचा वध होणार नाही. किंवा कोरोना कायमचा हद्दपार होणार नाही किंवा कोरोना चे पेशंट कमी होतीलच किंवा कोरोना चे पेशंट मिळणार नाही याची शाश्वती नाही .याचा तुम्ही-आम्ही आणि शासनाने सुद्धा शोध आणि बोध घेतलाच पाहिजे. करोना ला हरविण्यासाठी किंवा त्याचा कायमचा नायनाट करण्यासाठी महत्त्वाचं औषध एकच प्रत्येक नागरिकाने आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि दुसऱ्या चाही  जीव वाचविण्यासाठी नियमितपणे आणि काळजीने एकच करणे गरजेचे आहे ते म्हणजे मास्क वापरणे आणि गर्दी न करणे किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाणे मग बाजार असो किराणा दुकान असो एक फुटाचे अंतर ठेवून माल घेणे मात्र तोंडावरून मास्क न काढणे हेही लक्षात घेणे गरजेचे आहे ,आणि घरी येऊन साबणाने हात स्वच्छ धुवावेत एवढे जरी नियम पाळले तर हिम्मत नाही होणार त्या करोणा महामारी ची की ती तुमच्या शरीरात जाऊन बसेल. कळवण देवळा मालेगाव हे तालुके करोणा महामारी ने लक्ष्य केले आहेत म्हणजेच हॉटस्पॉट ठरले आहेत . यासाठी घाबरून न जाता नागरिकांनी स्वतःहून काटेकोरपणे नियम पाळणे गरजेचे आहे नियम पाळल्यास कोरोना महामारी त्या तालुक्यातून नक्कीच काढता पाय घेईल म्हणून बंद पाळणे म्हणजे करोना कमी होणार हे मात्र चुकीचेआहे .कोरोणा चा संसर्ग हा जास्त करून एकमेकांशी संवाद साधताना होतो त्यामुळे माउथ मास्क लावणे गरजेचे आहे . म्हणून कोरोना महामारी मुळे लॉक डाउन करणे किंवा बंद पाळणे असे मुळीच करू नये यामुळे जास्तच धोका असतो कारण बंद जरी पाळला तरी कधी ना कधी आपणास दुकानदारी चालू ठेवावीच लागणार मग त्याला पर्याय काय ? पुन्हा बंद पाळणार काय ? बऱ्याच नागरिकांचे उत्तर नाहीच असनार. कारण बंद पाळून पुन्हा व्यवसाय चालू केला तर गर्दी आलीच नागरिक रस्त्यावर आलेच मग शेवटी एकमेकात अंतर ठेवा मास्क लावा हे आलेच मग बंद पाळण्याचा हेतू काय ?आणि उपयोग काय ? अर्थात बंद पाळणे म्हणजेच एक प्रकारे चुकीचे धोरण म्हणता येईल म्हणून बंधन न बाळता वरील प्रमाणे नागरिकांनी काळजी घ्यावी . त्याचप्रमाणे शासनाने शहरात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागात कोरोना हटविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांना तातडीने ऑंटी जेन किट उपलब्ध करून दिल्यास सरकारी डॉक्टर आणि खाजगी डॉक्टर ह्या सर्वांनी मिळून शहरी आणि ग्रामीण भागातील घराघरात जाऊन प्रत्येक नागरिकांची ऑंटी जेन टेस्ट केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे तातडीने समजेल आणि कोरोना रुग्ण असल्यास त्यास तातडीने औषधोपचाराची मदत केली जाईल आणि रुग्ण बरा होईलच परंतु कोरोना संसर्ग जास्त होणार नाही कालांतराने कोरोणा चा समूळ नायनाट करण्यास मदत होईल. म्हणून लॉक डाउन करणे किंवा बंद हा उपाय मुळीच नाही. नागरिकांनी अगदी कटाक्षाने वरील नियम पाळल्यास कोरोना आपल्यापासून नक्कीच कायमचा पळ काढणार हेच खरे जर नागरिकांनी वरील नियम काटेकोर पाळण्यास निष्काळजीपणा केल्यास त्यास नक्कीच दंड आकारणे गरजेचे आहे मग तो शहरी असो की ग्रामीण भागातील असो यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील प्रशासनाने कठोर आणि गंभीर पाऊले उचलून वरील निर्बंध घालावेत. म्हणजे बंद पाळण्याची ही गरज नाही आणि आपण सुरक्षित आपले कुटुंब सुरक्षित राहुन कोरोना आपल्यापासून कोसो दूर जाईल आणि आपले व्यवहार सुरळीत चालू ठेवून आर्थिक घडी ,जनजीवन ,गोरगरिबांचे जीवन सुरळीत राहील उपासमार होणार नाही ,आर्थिक घडी विस्कटली जाणार नाही. हे मात्र खरे. कालपासून देवळा तालुक्याने दहा दिवसाचा बंद पुकारलेला आहे त्यास तालुक्यातील जनता प्रतिसाद देत आहेच परंतु वरील नियम काटेकोरपणे पाळले असते प्रत्येक नागरिकांनी तर बंद पाळण्याची वेळ आली नसती आणि देवळा तालुका हॉटस्पॉट ठरला ही नसता. दहा दिवसानंतर बंद उठवला गेला तर ? कोरोना तालुक्यात राहणार नाही याची शाश्वती काय ? मग पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या तोंडास मास्क आणि सोशल डिस्टन्स हे आलेच. मग बंद पाळण्याची गरजच काय हो ? नासिक,देवळा, मालेगाव , बागलान तसेच निफाड तालुक्यातील ओझर ह्या ठिकाणी नागरिकांनी सतर्कतेने राहून स्वतः काळजीने आणि दुसऱ्याचे काळजीने मुक्त असे राहण्यासाठी तोंडास मास सोशल डिस्टन्स याचा वापर न चुकता करणे आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यास कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्यास तमाम जनतेवरील संकट खेळण्यास खूपच मोलाची मदत होणार. 1 एप्रिल पासून ४५ वर्षा पुढील सर्व नागरिकांना देण्याचे सुतोवाच केंद्र सरकारने केले आणि त्याप्रमाणे लस देण्याचे सुरुवातही झाली परंतु नाशिक जिल्ह्यात पहिल्याच दिवशी लसीकरणाचा फज्जा उडाला लसीचा साठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात लस उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तातडीने पावले उचलून केंद्राकडे लसीची मागणी करून लागलीच शहर आणि ग्रामीण भागासाठी १ लाख,९० हजार लस पुणे येथून उपलब्ध करून देण्यात आली. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागातील देवळा, कळवण, मालेगाव ,सटाणा तसेच ओझर येथील टी. एम.ओ. ( तालुकाआरोग्य अधिकारी ) तसेच स्थानिक मेडिकल ऑफिसर यांचेशी नागरिकांनी संपर्क करून घेतल्यास लस घेण्यास अधिक तत्परता येईल आणि कोरोना पासून मुक्त होण्यासाठी तात्काळ मदत होईल परंतु लसीकरणाच्या बाबतीत मेडिकल ऑफिसर आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी जर ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वे केला तर लसीकरनात अधिक गतिमानता येईल. अशी अपेक्षा. ……… लेखक _ .. भारत पवार , संपादक /संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ,आणि नासिक जिल्हा कार्याध्यक्ष _ माहिती अधिकार का.महासंघ. .. मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here