लॉक डाऊन च्या भीतीने पोटात गोळा उठतोय दररोजच्या मजुरीवर गरिबांचा चुल्हा पेटतोय

0
41

भारत पवार , संपादक संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131
पुणे : आत्माराम बादाडे _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  माय बाप सरकार अगोदर जगण्याची व्यवस्था करा न नंतर खुशाल लॉकडाऊन करा शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात जनतेतून तिव्र संताप आहे.गरिब आणि सर्वसामान्य माणसं कोरोनामुळे नंतर मरण पावणार आहेत पण आधी भाजी भाकर मिळत असल्यामुळे मरण पावतील प्रधानमंत्री,मुख्यमंत्री साहेब तुमच्या सह सर्व आमदार खासदार मंत्री यांच्यासह तिस दिवसांचा पगार हा गरिब हातावर पोट असणाऱ्यांना द्या आणि नंतरच लॉकडाऊन करा…।
*रिकाम्या हातानं मायबाप घरी येतील,गोरगरिबांची पोरं उपाशीच झोपी जातील साहेब.* गेल्या साल भरापासून कोव्हिड,कोरोना आणि लॉकडाऊन या शब्दाचा भडीमार केला.आता कोरोना रुग्णांचा आकडा झापाट्याने वाढत असल्याने शासन प्रशासन चिंतेत आहे कोरोनाच्या अद्श्य विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा राज्यात कडक लॉकडाऊन तर नाही लागणार या चिंतेत गरिब सर्वसामान्य माणूस जगत आहे,असे झाले तर पोटापाण्याचा आणि रोजणदारीचा व आर्थिक प्रश्न उद्भभवल्याशिवाय राहणार असल्यामुळे साहेब पोठावर का मारता मागच्या लॉकडाऊनमध्ये देशातील श्रीमंत अधिक बनले,तर गरिब लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि गरिब माणसं भाजी भाकरी खाण्यासाठी नसल्यामुळे मरण पावली होती..।
आॕक्सफॕमच्या अहवालानुसार देशातील आघाडीच्या १०० श्रीमंतांच्या संपत्तीत तब्बल ३५% वाढ झाली ही वाढ इतकी होती की तेवढ्या संपत्ती तून देशात पुढची १० वर्षे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना किंवा आरोग्य मंत्रालयाचे काम चालू शकले असते याउलट ८४% लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होतो.एकट्या एप्रिल २०२० मध्ये प्रत्येक तासाला १ लाख ७० हजार लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती..पुण्यामध्ये लॉकडाऊन मध्ये गेलेली नोकरी आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना पुण्यातील कोंढवा खुर्दमध्ये घडली आहे.. त्यानंतर दुसरी घटना ही ८ एप्रिल २०२० ला पुण्यामध्ये एक घडली होती,घरी अन्न नसलेल्या खाण्यासाठी लहान मुलांनी उंदीर मारायचं औषध खालले होते..सविस्तर घटना,घरामध्ये अन्न नसल्याने दोघं नवरा बायको झोपले होते त्यांचा तीन वर्षाचा मुलगा भुकेनं व्याकूळ होऊन घरातून बाहेर गेला,शेजारी असलेल्या उकिरड्यावर त्यांला उंदीर मारायचं औषध सापडलं आणि त्यानं ते काही खाल्ल्यावर त्यांच्या आईकडे वडिलांना कडे जाऊन म्हणू लागला कि बघं आई मि काय खाल्ल मि जेवन केलं असा म्हणाला आईवडिलांनी हे पाहताच आरडाओरडा केला..। दुर्दैवी घटना..त्यानंतर तीसरी घटना हि संभाजीनगर(औरंगाबाद) मध्ये घडली होती..रेल्वे पटरी वरती कामगार मजदूर गांवी जात असतांना त्यांचा मृत्यू झाला होता अपघात..सरकार जर तुम्ही लॉकडाऊन केले तर आमचा काम धंदा बंद झाल्यावर घरातले अन्नधान्य संपलेले असतील मग अशा परिस्थितीत मुलाबाळांना जगावयाचे कसं.लॉकडाऊन करायच्या आधी सरकारने आम्हां गरिबांना जगवण्याची जबाबदारी घ्यावी.ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिब कुटुंबांची अवस्था अत्यंत नाजूक आहे,यातले बरेच जण रेशन कार्ड धारक नाहीत,महाराष्ट्र सरकारच्या योजनेमध्ये केवळ कागदपत्रं नसल्याने ते बसू शकत नाहीत मग अशा गरिब कुटुंबांनी करायचे काय,खायचे काय.?
*हृदयाच्या जखमा दिसत नसल्या तरी वेदना खोलवर गेलेल्या असतात साहेब..*
राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने सामान्य गरिब माणूस हवालदिल झाला आहे.त्याला त्याच्या अस्तित्वाची काळजी लागली आहे गतवर्षी बावीस मार्चला त्याच्या मानगुटीवर लॉकडाऊनची कु-हाड पडली अन तो पुरता उध्वस्त झाला. तब्बल आठ-दहा महिने लॉकडाऊनचा खेळ सुरू राहिल्याने सामान्य गरिब माणूस आणि त्याचे अर्थकारण पुरते झोपले अचानकच झटका आल्या सारखे त्याला बंदिस्त केल्याने सामान्य माणूस एकवेळच्या जेवणासाठी मोताद झाला होता.त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र माकडचाळे करण्यात व्यस्त होते. ‘दिवे पेटवा थाळ्या वाजवा” असल्या मुर्ख आणि खुळसट कल्पना सांगून देशाला वेड्यात काढत होते.लोकांना वाचविण्याची उपाय योजना कमी आणि मुर्खपणाचे चाळे सुरू होते काही भक्त मंडळी या माकड चाळ्यांचे तार्कीक महत्व सांगत होती एकावेळेस इतके दिवे पेटतील,त्यामुळे इतकी उर्जा निर्माण होईल मग असे होईल तसे होईल,कोरोना नष्ट होईल !” असले बावळट युक्तीवाद केले जात होते.तर *दुस-या बाजूला गरिब सामान्य माणसाची चुल बंद होती.* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवे पेटवण्याचे आवाहन ज्या वेळी केले होते त्याच वेळी या *देशातल्या लाखो चुली अन्न-धान्याभावी पेटलेल्या नव्हत्या.कित्येक झोपडीत लहान लहान मुले उपाशीपोटी झोपली होती. हे या देशाचे विदारक वास्तव आहे.* दिवे पेटवण्याने आणि थाळ्या वाजवण्याने ना कोरोना गेला ना आटोक्यात आला.लॉकडाऊनच्या या कालखंडात लोकांची प्रचंड पिळवणूक झालीदेशाचे “न भुतो न भविष्यती” नुकसान झाले. लॉकडाऊनच्या तडाख्याने गरिब सामान्य माणूस शेतकरी कष्टकरी कामगार मजूर आदी वर्ग पुरता उध्वस्त झाला आहे.या विदारक परस्थितीने खुप मोठा वर्ग आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे.त्यातल्या कित्येकांनी काही लोकांनी आत्महत्या केल्याही आहेत…
*कोरोना रोगापेक्षा लॉकडाऊनचा रोग भयंकर निघाला.* कोरोनाची बाधा झालेले ठणठणीत झाले पण लॉकडाऊनची बाधा झालेले गरिब माणसं आज तागायत दुरूस्त झालेले नाहीत.गत लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब लाईव्ह यायचे.”भाडे घेवू नका, कुणाला त्रास देवू नका,एकमेकांना मदत करा आधार द्या,धीर द्या !” असे आवाहन करायचे. त्यांनी ते आत्मियतेने केलेलं आवाहन बरं वाटायचं मनाला दिलासा देवून जायचं.संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला याचे कौतुक वाटायचं.पण नंतरच्या काळात ना कुणी भाडे कमी केले,ना कुणी आधार दिला. (काही अपवाद वगळता ) अनेक ठिकाणी पोरांनी आई-बाप घरात घेतले नाहीत,बायकोने नवरा घरात घेतला नाही.गाववाल्यांनी गावची माणसं गावात घेतली नाहीत. सगळी नाती-गोती मतलबी असल्याचे लक्षात आले. प्रारंभीच्या काळात जनावरापेक्षा वाईट वागणूक माणसं परस्परांना देत होती.”लोकांना धीर द्या !” म्हणून सांगणारे सरकारवालेही तसलेच निघाले जर लॉकडाऊन करायचेच असेल तर ठाकरे सरकारने लोकांना विषाची पुडी द्यावी. सामान्य माणूस,गोरगरीब माणूस ते विष खाऊन सुखाने मरेल. कोरोना झाला तरी आणि नाही झाला तरी त्याचे मरण अटळच आहे. त्याची पिळवणूक, छळवणूक अटळच आहे. त्यापेक्षा सरकारने सामान्य लोकांच्यावर दया करावी.त्यांना सहज मरता यावे यासाठी विषाच्या पुड्या घरोघर वाटाव्यात अन मगच लॉकडाऊन करावे.मरण्यासाठी विष विकत घेण्याचीही औकाद या गरिब सामान्य माणसांची राहिलेली नाही?
गरिब सर्वसामान्यांचा कुटुंबाचा पोटापाण्याचा आणि आर्थिक प्रश्न भेडसविणारा आहे.पोटाला दोन वेळ जेवण मिळेल का नाही यांची श्वासनती देता येत नाही.लॉकडाऊन लागले तर हाताला काम मिळेल का? पोटाला जेवण मिळेल का?अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही हे जेवढ सत्य आहे.तेवढ कोरोना सुध्दा भयाकर आहे हे सुध्दा नाकारुन चालणार नाही.याच सत्य कोरोना उपचार घेऊन आलेल्यांना विचारल्यावर लक्षात येईल त्यामुळे यावर उपाय म्हणुन निर्बंध कडक करा परंतु लॉकडाऊन पर्याय देऊ नका.गरिब जनतेच्या दोन वेळस जेवणाच आणि दररोजच्या आर्थिक भाराचा प्रश्न सोडवा आणि करायचे असेल तर खुशाल लॉकडाऊन करा,परंतु असे न करता लॉकडाऊन झाले तर पाठी वरच्या मारापेक्षा हि पोटावरचा भुकेचा मार मारक ठरेल.तो आपल्या हातून होऊ नये म्हणुन कष्टकरी कामगार मजदूर,शेतमुजर ऊसतोड कामगार गरिब सर्वसामान्य शेतकरी आणि हातावर रोजणदारी करुन पोट भरणारा या माणसांच्या मनातील शब्दांत न मांडता येणारी अंर्त हाक आपण ऐकावी हिच अपेक्षा तुमच्याकडून माय बाप सरकार..।
लेखक – ✍️ शिवश्री संतोष शंकूतला
आत्माराम बादाडे पुणे .🙏🏻💐🚩
सर्वसामान्य कष्टकरी कामगार मजदूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here