खा.प्रीतम मुंडेंच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये आमदारांनी स्वतःचे वजन किती आहे हे राज्य सरकार कडून कामे आणून दाखवावे _राहुल पोटे

0
12

भारत पवार मुख्य संपादक संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131

जिरेवाडी ते बार्शी रोड 18 कोटींच्या कामाला खा. प्रितमताईंमुळेच मंजुरी*

बीड _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ नेटवर्क  _ शोभा बल्लाळ — भाजप नेत्या खा. प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत जिरेवाडी ते बार्शी रोड रस्त्यासह अन्य कामांसाठी निधीची मागणी केली होती. सन 2020 मध्ये जिल्हा सनियंत्रण समिती ( दिशा ) च्या बैठकीत खा. प्रितमताई मुंडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे अंदाज पत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. सदरील रस्त्याच्या कामाला खा. प्रितमताईंमुळेच निधी मिळाला असून बीडच्या आमदारांनी केंद्राच्या निधीतून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याऐवजी राज्य सरकारकडून काम आणून दाखवावे आणि मगच श्रेय घ्यावे असे ताई समर्थक राहुल पोटे यांनी म्हणल आहे

राहुल पोटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बीड शहरासह लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खा. प्रितमताई मुंडे यांनी दि. 11 डिसेंबर 2020 आणि त्यानंतर दि. 23 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी खा. प्रितमताईंनी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.211 च्या कामासाठी निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी ना. नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होता. खा. प्रितमताईंनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता जिरेवाडी ते बार्शी रोड या रस्त्याच्या कामासाठी 18 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र नेहमीप्रमाणे बीडच्या आमदारांनी या कामाचेही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊन आम्ही खूप काम करत आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये. आधी स्वतः राज्य सरकारकडून मोठे काम आणून दाखवावे आणि मगच श्रेय घ्यावे असे ताई समर्थक राहुल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here