देवळा नगरपंचायत इलेक्शन राजकीय उलापालथी जरूर होणार जितेंद्र आहेर यांचा राजीनामा परंतु भाजप ची वाट धरणार की राजकीय सन्यास घेणार हे गुलदसत्यातच
1 min read
देवळा : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” साठी भारत पवार _ नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा नगर पंचायतीचे इलेक्शन पुढील काही महिन्यांत येऊन ठेपले असताना राजकीय वातावरण ऐन थंठीत गरम होऊ पहात आहे.राजकीय राजीनामा नाट्य तर धूम धडाक्यात सुरू झाले सुद्धा.त्यामुळे देवळा तालुक्यातील राजकीय पटलावर वेगळीच उलथापालथ होणार हे काही दिवसात तालुका वासियांना पहायला मिळणार मग यात पक्ष मजबूत होणार की गावातील विकास काम मजबूत होणार की राजकीय नेते आपले वर्चस्व मजबूत करण्या साठी आपले वजन पणाला लावणार हे मतदारांना विचार करण्या सारखे आणि विचारात टाकण्या सारख्या खेळी केल्या जाणार हे स्पष्ट होतेय.अलिकडेच काही दिवसां पूर्वी राषट्रवादी काँग्रेस चे देवळा तालुका सर्वेसर्वा जितेंद्र आहेर यांनी राजीनामा दिला .त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण गरम होऊन एक वेगळीच ऐनवेळी कलाटणी घेऊ पहात आहे .गेली 10 ते 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे घड्याळ हातात मनगटी बांधून अनेकदा निवडणुका लढविल्या , जिंकल्या सुद्धा आणि आपल्या वार्ड मध्ये विकास कामे केली सुद्धा.आणि अनेक पद भूषविणारे जितेंद्र आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाचा राजीनामा दिला आणि तालुक्यात चर्चेला वाव मिळून दिला .परंतु राजीनामा दिला हे जरी खरे असले तरी जितेंद्र आहेर यांच्या मनगटी आजही घड्याळ घातलेले आहेच आणि हे घड्याळ हातात कायम राहणार हे सत्य नाकारून चालणार नाही. असे असले तरी जितू आण्णा यांनी राजीनामा देऊन भाजपचा रस्ता धरणार असेही चर्चिले जात असले तरी आहेर हे कमळाचा गुच्छ हातात धरून चालणार की राजकीय संन्यास घेणार ? की अन्य पक्षात स्थानापन्न होणार हे आजही गुलदस्त्यात असल्याने लवकरच देवळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार त्यामुळे देवळा तालुक्यातील राजकीय खेळी गरमा गरम होणार आणि ऐन निवडणुकीत राजकीय रणधुमाळी जबरदस्त रंगणार असल्याचे चित्र दिसत असून पोलिसांना सुद्धा यावेळी कसरत करावी लागणार असून त्यांनाही मोठी सावध भूमिका बजवावी लागणार असल्याने पोलिसांच्या नजरा राजकीय वातावरणाच्या खेळी कडे लागले असल्याचे साहजिकच आहे.

पाहिजेत : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात ” महाराष्ट्र न्यूज “साठी पत्रकार नियुक्ती चालू आहे. इच्छुक असणारे व प्रचंड जनसंपर्क असणाऱ्यांनी त्वरित संपर्क करावा. संपर्क :भारत पवार, मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131