नवीमुंबई – क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” – प्रतिनिधी _अनधिकृत लोकार्पणाची वाट न पाहता उद्यान केले जनतेसाठी खुले
सीवूड्स विभागांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान लोकार्पण सोहळ्याचे बॅनर दिसत आहेत. उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम नुकतेच महानगरपालिकेकडून करण्यात आले. पण त्याच्या ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पणाचे बॅनर माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी लावले आहेत. अशा सोहळ्याची कोणतीही परवानगी महानगरपालिकेकडून देण्यात आलेली नाही. सध्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व महापौर असे लोकप्रतिनिधी नसताना पालिकेचा कारभार हा प्रशासनाच्या म्हणजेच आयुक्तांच्या देखरेखेखाली चालू आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे लोकार्पण करायचे असल्यास ते आयुक्तांच्या किंवा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच झाले पाहिजे.
सदर बाबीचे गांभीर्य ओळखून मनसेने सदर प्रकार आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार , उद्यान विभाग उपायुक्त मनोज कुमार महाले
यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच हा प्रकार होऊ नये अशी तंबी दिली.
मनसे शहर सचिव सचिन कदम आणि विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांनी सदर उद्यान नागरिकांसाठी खुले केले. तसेच नागरिकांना लोकार्पणाची वाट न पाहता उद्यानाचा वापर करावा असे आवाहन केले. सदर उद्यान खुले करताना उप विभागअध्यक्ष अप्पासाहेब जाधव, राजू खाडे , माजी उप विभागअध्यक्ष भरत पासलकर, शाखा अध्यक्ष कैलास यादव, संतोष टेकवडे, पालिका कामगार सेना शहर उपाध्यक्ष मंगेश काळेबाग , उप शाखा अध्यक्ष अजय पाचपुते, अखिल खरात, उमेश हातेकर, काळू ससाणे, वैभव शेळके, मयूर शिंदे, सतीश क्षिरसागर, शिवाजी बागडे, संतोष कुमार आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्ती चालू आहे _ महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात पत्रकार आणि जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती चालू आहे.आवड असणाऱ्या व जास्त जनसंपर्क असणाऱ्यांनी त्वरित संपर्क करावा. मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131
