मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपा सारखे जातीयवादी _ प्रा.इलियास इनामदार

0
75
  1.  

    बीड – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _राज्यात कांग्रेस-राष्ट्रवादी-सेनेचे आघाडी सरकार आहे सरकार बनवताना सेनेसमोर कांग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिम आरक्षणासह अनेक मुद्दे ठेवले होते ज्यावर सर्वांनी या मुद्दयांवर शिक्का मोर्तब केले होते परंतु एक वर्ष होऊन सुद्धा आघाडी सरकार मधून कोणीच मुस्लिम आरक्षणावर साधा आ.. पण उच्चारीना कांग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिम समाजाची फ़क़्त निवडणूकीपूरती आठवण होताना दिसते आरक्षण देण्यासाठी समाजाची आठवण होत नाही असा टोला लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी लगावला आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मानसिकता दिसत नाही कारण दसरा मेळाव्याला भाषण करतांना मुख्यमंत्री यांनी मराठा, धनगर व ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केला परंतु मुस्लिम आरक्षणा बद्दल एक शब्द बोलले नाही यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपा सारखी जातीयवादी मानसिकता दिसुन येत आहे, शिवसेना मुस्लिमांना आरक्षण देणार नाही त्यासाठी कांग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्री व सरकारवर दबाव टाकावे याकरीता लोकसेना संघटना कांग्रेस अध्यक्षा सोनिया गाँधी, राहुल गाँधी, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे निवेदन करणार आहे अशी माहिती लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. व सोबत वल्लभगढ़ येथे एकतरफा प्रेम प्रकरणातील विद्यार्थीनीवर झालेल्या खुनी हल्ल्याची लोकसेना संघटना जाहीर निषेध करत असून आरोपींना कड़क शासन करावे काही हिंदुत्वादी संघटना या घटनेला लवजिहादचे नाव देत असून हे लवजिहाद नसून लवआजार आहे आणि हे कोणालाही होऊ शकते असे इलियास इनामदार यांनी सांगितले फ़्रांस येथील कार्टून घटनेचा लोकसेना संघटना जाहीर निषेध करत असून फ्रांस घटनेचा भारत सरकारने निषेध करावा व संपूर्ण जगाने फ्रांसला या घटनेवर माफ़ी मागावयास लावावी अशी प्रतिक्रिया प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here