धनगर समाजाला वेठीस न धरता तात्काळ आरक्षण द्यावे – आर.पी.कुंवर

0
31

मालेगाव – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _ गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज आपल्या हककाच्या सवलती मिळण्या साठी झुंज देत आहे ही झुंज काही अंशी कॉंग्रेस  सरकारच्या काळात यशस्वी सुद्धा झाली परंतु सद्याचे भाजपा सरकारने त्यावर टांगती तलवार आजही टांगती ठेवल्याने धनगर समाजाला अनेक सवलतीना मुकावे लागत आहे एक प्रकारे हा अन्याय असून हा अन्याय सहन करण्याची क्षमता आता संपली असून ह्या समाजाचा अंत न पाहता आताच्या केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेऊन आरक्षण लागू करावे अशी मागणी महाराष्ट्र न्यूज वेब चॅनलचे पत्रकार / विभागीय संपादक आर.पी.कुवर यांनी केली आहे.त्यानी पुढे म्हटले की राजपत्र, The Gazette of India, भाग II खंड I मध्ये दि. ८ जानेवारी वार बुधवार २००३, नवी दिल्ली, मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय राजपत्रातील, पान नंबर 7 वरील अनु. नंबर 53, मध्ये धनगर जातीचा एसटी प्रवर्गात स्पष्टपणे उल्लेख केलेला असून त्याप्रमाणे केंद्राने राज्य शासनाला स्पष्टपणे आदेशित करणे गरजेचे आहे. सदर बाब ही केंद्र शासनाच्या गृहविभागाच्या अखत्यारीत असून सदर सूची प्रमाणे प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशला धनगर आरक्षणाचा लाभ तात्काळ देण्या बाबत आदेश देण्यात यावेत. याबाबत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर कुणाच्याही आरक्षणावर गदा येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याप्रमाणे राज्यशासनाने सुद्धा तात्काळ अंमलबजावणी करून समाजावरील अन्याय दूर करावा. सदर केंद्रीय राजपत्रातील प्रसिद्धी पत्र पाहता धनगर आरक्षण हे अगोदरच दिले गेले आहे फक्त त्याची अंमलबजावणी करणे अभिप्रेत आहे. हा सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार यांनी धनगर समाजाप्रती असलेल्या भावनेचा आदर राखणं गरजेचं आहे राज्यातील करोडो धनगर समाजाचा अस्मितेचा प्रश्न असून समाज नक्कीच शासनाच्या पाठीमागे खंबीर पने उभा राहील. तरी शासनाने वरील केंद्रशासनाच्या गॅजेट प्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे विभागीय संपादक , आर. पी. कुवर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here