उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जाळे वाढवणार : डॉ.नितीन पाटील

0
516

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज.            आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती आणि नव्याने पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१.                                मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :

उत्तर महाराष्ट्रात फिरून संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील यांनी दिली.डॉ.नितीन पाटील यांनी मालेगाव येथे नुकतीच डॉकटर सेलची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले.त्यांनी

डॉ.पाटील यांनी डॉक्टर सेल बळकट करण्यासाठी काम सुरू केले असून त्यांनी नाशिक येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड तसेच प्रशांत पवार ,सुरेश गवळी ,अमित जाधव, बापूसाहेब वाकचौरे, निलेश कदम ,दिगंबर शिंदे ,राजेंद्र कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मालेगाव येथे बैठक घेतली त्यावेळी मालेगाव मार्केटचे उपसभापती विनोद चव्हाण ,मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप पवार ,मालेगाव तालुका डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील ,उपाध्यक्ष डॉ.धीरेंद्र चव्हाण, डॉ. किशोर जोशी, डॉ.राकेश रौंदळ, संकेत बेडसे, डॉ. प्रशांत निकम , डॉ.चंद्रशेखर पवार मालेगाव बाह्य मतदार संघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जाळे कसे मजबूत करता येईल यावर डॉ.नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here