केंद्रीय मंत्री कै.रामविलास पासवान यांची आठवण झाली , श्रीरामपूर सर्व पक्षीय श्रद्धांजली वाहिली

0
36

श्रीरामपूर -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी —  भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री कालकथीत रामविलासजी पासवान यांचे प्रदिर्घ आजाराने दु:खत निधन झाले, त्यांना श्रीरामपुर तालुका सर्व पक्षीय वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा श्रीरामपुर शहर येथे तालुका व शहर परिसरातील सर्व पक्षीय मान्यवर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेचे आयोजन आर. पी. आय. अहमदनगर जिल्हा नेते श्री भिमभाऊ बागुल यांनी केले होते, यावेळी लुंबिनी बौध्द विहारचे अध्यक्ष श्री सुगंधराव ईगळे साहेब,नगरसेवक श्री दिपक चरणदादा चव्हाण, श्री नागेश सावंत (कामगार नेते) माजी नगरसेवक श्री महेंद्र त्रिभुवन, श्री दिपक कु्-हाडे रितेश एडके, मच्छिद्र ढोकणे, आनंद चावरे, उपस्थित या प्रसंगी श्री भिमभाऊ बागुल यांनी श्रध्दांजली शोक प्रकट करत  रामविलासजी पासवान  आयुष्य भर दीनदलित , गरीब माणसाला न्याय मिळवुन देण्यासाठी झटले, ते हाजीपुर लोकसभा मतदार सघांतून नऊ वेळा लोकसभेवर निवडनु आले, एक सामान्य मानुस ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे, मी अशा एका गोरगरिबाचे मागासवर्गिय जनतेच्या मनातिल नेतृत्वास भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत शोकाकुल भावना व्यक्त केल्या, या प्रसंगी सर्व पक्षीय तर्फे दिपक चरणदादा चव्हाण, कामगार नेते श्री नागेशजी सावंत, मेहेद्र त्रिभुवन, आठवाल अर्जुन, श्री सुगंधराव ईगळे साहेब, रितेशजी एडके, मच्छिद्र ढोकणे, अरुण राज त्रिभुवन, सावंन्त साहेब, सरपंच सुनिल शिरसाठ, राजु नाना गायकवाड़ (RPI शहर अध्यक्ष) बंटी सेट आच्छाडा, मोहन आव्हाड, (ग्रा.स.) विकास नरोडे, श्रीकांत जमादार, समाधान तायड, वसंत साळवे, प्रकाश आहिरे, राहुल आठवाल, विशाल सुरडकर, अविनाश गायकवाड़, प्रदिप गायकवाड़, आदींनी श्रध्दांजली अर्पण केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here