गावगुंडांनी क्रूरपणे केली मारहाण त्यात रामदास जोशी गतप्राण ,पोलिसांची दिरंगाई वंचितचे दीपक डोके करणार न्याया साठी आंदोलनाची लढाई
1 min read
*जालना: महाराष्ट्र न्यूज , आशिष मोरे – याज कडून -भोकरदन तालुक्यातील धनगरवाडी चिंचोली निपाणी येथील मेंढपाळ रामदास कडुबा जोशी व योगेश आप्पा जोशी यांना गावातील गावगुंडांनी कुर्हाडीने डोक्यात व मानेवर घाव घालून तसेच अंगावर ट्रॅक्टर घालून अमानुषपणे मारहाण करून गंभीर जखमी केले त्यात रामदास कडुबा जोशी यांचा मृत्यू झाला या हत्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिपक डोके यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन करून याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व संबंधित पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याने संबंधितांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, अँड.कैलास रत्नपारखे,विनोद दांडगे, अँड.हर्षवर्धन प्रधान,अमोल साळवे यांची उपस्थीती होती.
