January 15, 2022

कोरोना देवदूत ठरले रामशेठजी ठाकूर – राज्यपाल देणार पुरस्कार

1 min read

 

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” दीपक शिंदे – याज कडून –
खारघर,  : रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामधील अढळ तारा, सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजेच लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर ..

जागतिक कोरोना महामारीत सरकारच्या सूचनेनुसार अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले,परंतु अश्याही परिस्थितीत अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांनी समाजाची सेवा केली. यातील अनेकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,या सर्वात माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने रामशेठजी ठाकूर यांना गौरविण्यात आले, परंतु लोकांमध्ये देव शोधणाऱ्या महान विभूतीला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते _कोरोना देवदूत_ हा मिळणारा पुरस्कार खासच आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात अनेक गरजू व्यक्तींसाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून लॉकडाउन उठेपर्यंत विविध ठिकाणी अन्नछत्रे उभी राहिली होती,ज्यामुळे लाखो नागरिकांचा एका वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आदिवासी पाडे,ग्रामीण भाग, रोजंगारीवर काम करणारे,रिक्षा चालक,परप्रांतीय,झोपडपट्टी मधील अनेक कुटुंबियांना अन्न वाटप केले. लॉक डाउन काळात गणपती सण गोड व्हावा म्हणून साठ हजारावर नागरिकांना प्रसादाच्या रूपात शिधावाटप करण्यात आले.अनेक पत्रकारांना अर्थसहाय्य केले. त्यांचा दानशूरपणा संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्ञात आहे. सामाजिक भान व समाजावरील असलेली आस्था वेळोवेळी दिसून आलेली आहे. फक्त हा पुरस्कार मिळणार असल्याचे जाहीर झाल्यावर त्यांच्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव झाला त्यातून त्यांच्यावरील असलेले प्रेम दिसून येते.

हा पुरस्कार समारंभ बुधवारी राजभवनात होणार असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांच्या उपस्थितीत व मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित होणार असल्याचे दै. शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी सांगितले.

More Stories

1 thought on “कोरोना देवदूत ठरले रामशेठजी ठाकूर – राज्यपाल देणार पुरस्कार

  1. अभिनंदन सर .
    बन्द काळा मधे अपण जे गरिब आणि गरजू लोकाना अन्न छत्र सुरु केले होते ते अतिशय महत्वाचे कार्य अपना कडून घडले आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यां नी आपला जीव धोक्यात घालुन खास करुन खारघर चे ही कार्यकर्ते छान नियोजन पूर्वक कार्य केले.
    आपणास भरभरुन सुभेछा.
    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.