ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला परंतु आरोपी कमलाकर पवार मोकाट ,आंबेडकरी जनतेत संतापाची लाट ..! पोलिस आणि महसूल प्रशासनाने मालेगाव शांततेचा भंग होण्याची नका पाहू वाट _ आरपीआय नेते

0
72

भारत पवार , मुख्य संपादक.                                    पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१.                                            मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगावच्या शांतेत व एकोप्यात मीठाचा खडा टाकून शांततेचा भंग करून जातीयवादाला रंग देऊन राडा होऊ पाहणारा हरामखोर नराधमा विरुद्ध पोलिसात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला खरा परंतु तो बदमाश पैशांचा माज असलेला आजही मोकाट असल्याने आंबेडकरी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.

गेल्या ३० डिसेंबर ०२३ रोजी कमलाकर पवार याने विश्वरत्न तथा भारतरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरून तमाम आंबेडकरी जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.म्हणूनच की कमलाकर पवार विरुद्ध छावणी पोलिसात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला खरा परंतु आरोपी मोकाट कसा ? पोलिसांनी फक्त कागदोपत्री सोपस्कार पार पाडून आंबेडकरी जनतेत आणि आंबेडकरी तथा समस्त आर.पी. आय नेत्यांमध्ये देखावा उभा केला की ह्या नेत्यांची दिशाभूल केली जात आहे ? चांगल्या चांगल्याचा माज पोलीसच जिरवतात मग हा माजलेला बकरा मोकाट कसा ? कोणाच्या आशीर्वादाने आज पर्यंत मोकाट ठेवलाय ? कमलाकर यास पकडणे म्हणजे मालेगावच्या पोलिसांना आव्हान आहे काय ? यांसारखे अनेक प्रश्न मालेगावच्या आर.पी.आय.( आठवले गट) च्या समस्त नेत्यांना भेडसावत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र नेते, महामानव ह्या नेत्यांबद्दल कमलाकर अपशब्द वापरून डॉ.बाबासाहेबांचा अवमान करतो हे आंबेडकरी जनता कदापी सहन करणार नाही. जाणून बुजून पोलीस त्यास शोधत नाही हा पोलिसांचा सुद्धा कर्तव्याचा अवमान आहे.असा आरोप आरपीआय चे माजी जिल्हा अध्यक्ष दीपक निकम यांनी केला. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवसीय धरणे धरणा आंदोलन करून शासनास यावेळी इशारा देण्यात आला .यावेळी निकम बोलत होते.पुढे त्यांनी सांगितले की येथील पोलीस व महसूल प्रशासनाने गेंड्याच्या कातडे पांघरले असल्याचे आमच्या निदर्शनास आले कारण आमच्या धरणे धरणा आंदोलनास पोलीस प्रशासनाने किंवा महसूल प्रशासनाने साधी भेटही दिली नसल्याने ह्या नेत्यांच्या आंदोलनाकडे पाठच करू या ? असे येथील दोघा प्रशासनाचे आजच्या कारभारावरून दिसले असा संतापजनक आरोप निकम यांनी महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनलशी बोलतांना केला.

येत्या दोन दिवसांत कमलाकर पवार यास पोलिसांनी हुडकून अटक न केल्यास समस्त आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरणार ,आंदोलन छेडणार,मोर्चा काढणार  त्याचे परिणाम प्रशासनास भोगावे लागतील असा इशाराही यावेळी समस्त आरपीआय आठवले गटाचे नेते दीपक निकम , भारत चव्हाण , वाल्मिक सोनवणे , दादाजी महाले , भारत जगताप , दिलीप अहिरे , सुभाष अहिरे आदींनी दिला.

आमच्या काळजात हात घालणाऱ्या त्या नालयकास पोलीस का घाबरतात ? त्यास हुडकने पोलिसांना अवघड नाही चांगले मोठे मोठे गुंड पोलीस हुडकून काढून कोठडीत घालतात मग हाच का सापडत नाही ? आमच्या भावनांना हात घालून मालेगावची शांतता बिघडण्याची वाट का पहावी ? असा संताप जनक सवाल दादाजी महाले यांनी पोलिसांना केला असून आंबेडकरी जनतेचा अंत पाहू नये असे सांगून कमलाकर यास तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी केली.धरणे आंदोलन कार्यक्रमास आरपीआयचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here