June 27, 2022

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा सत्कार झाला,भरल्या अंतःकरणाने नवले यांनी मालेगाव मधून निरोप घेतला …

1 min read

मालेगाव येथे निरोप समारंभ प्रसंगी जड अंतःकरणाने पुष्पगुच्छ गुच्छ देताना मधुकर केदार ,सर व अन्य कार्यकर्ते छाया चित्रात दिसत आहेत

मालेगाव – कसमादे टाइम ” महाराष्ट्र न्यूज ” करीता -मालेगाव म्हटले तर भल्या भल्यांची टरकते ,मालेगाव म्हटले तर अतिसंवेदनशील महानगर म्हणून प्रसिद्ध झालेले , आणि मालेगाव म्हटले अत्यंत घनदाट लोकसंख्या असलेले- दल दलीचे शहर म्हणून ओळखले जाते अशा शहराचा रिमोट रत्नाकर नवले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून हातात घेतला आणि मालेगाव महानगर कंट्रोल करून कंट्रोलतेकडे झुकविले आणि जनतेचा विश्वास संपादन करून जनतेच्या मनात घर केलेले ,कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी येथून बदली होऊन बाहेर पडतो तर खरंच अनेकांच्या भावना अनावर झाल्या …. बदली झाल्याने

मालेगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले  यांचा येथे नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समिती व मालेगाव येथील सामाजिक व धार्मिक नेते यांनी dysp रत्नाकर जी नवले साहेब यांना भरल्या अंतःकरणाने निरोप  दिला.त्याना नाशिक येथे जाणे गरजेचे असल्याने ओघवता आढावा घेतला.आणि बोलता बोलता सहज बोलून गेले व म्हणाले की आपला इतरांच्या बद्दल चांगला हेतु असेल तर समोरच्या व्यक्तीचा सुद्धा चांगलाच हेतु असतो… म्हणुन सरकारी खात्यात अनेक बदल्या झाल्या व होतील पण मला त्याचा कधीच त्रास झाला नाही.  नवले साहेब मलाही आपले बद्दल बोलायचे होते…पण आपण आम्हास सोडून जात असल्याने दुःख वाटते शब्दच निघत नाही असे प्रेम आणि तितकीच शिस्त तुम्ही आम्हास दिले .आणि आज तुम्ही आम्हास सोडून जात आहात .त्यामुळे मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत,आपण खुप संयमाने सर्व हॅन्डल केले.आपण इगो दाखवला नाही.आम्हा ज्येष्ठ लोकांचा सन्मान केला.एकात्मता जोपासत असताना आपण खुप वेळ दिला.प्रसंगी जेवण घेतले नाही.duty first या तत्वाला अधिक महत्त्व दिले.आपल्या देशसेवेस मी मधुकर केदार सर वंदन करतो.आणि जड पाऊलांनी

नवले सरांनी मालेगाव करांचा निरोप घेतला .

**********************†*************

नियुक्ती चालू आहे …तात्काळ संपर्क साधा —

* कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी -मुबंई , नवी मुंबई, ठाणे,पालघर,विक्रोळी, कल्याण, दादर,घाटकोपर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात पत्रकार, जाहिरात प्रतिनिधी आणि कार्यकारी संपादक,सहसंपादक,उपसंपादक, वृत्तसंपादक,विभागीय संपादक,ब्युरो चिफ, व्यवस्थापक आदींच्या नियुक्ती करणे आहेत , पत्रकारितेत करिअर करणाऱ्या इच्छुक तरुणांनी,तरुणींनी तात्काळ संपर्क साधावा ….

संपर्क :-  भारतराज पवार , मुख्य संपादक  , कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” -9158417131

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.