जरांगे पाटलांच “पायदळ ” मुंबईच्या दिशेने ! शिंदे सरकारला घाम सुटणार धास्तीने …!!

0
83

भारतराज पवार : मुख्य संपादक                          आपल्या परिसरातील बातम्या,जाहिराती साठी तसेच पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा. मो. ९१५८४१७१३१                                              देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जरांगे पाटलांच् पायदळ निघालं मुंबईच्या दिशेने! शिंदे सरकारला घाम सुटणार त्यांच्या धास्तीने ,
शिकस्त करुनच वापस येनार…!  जरांगे पाटलांच्या दौऱ्यांचा आज सहावा दिवस आहे, बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे,बाया बापड्या आपल्या चिल्यांना बरोबर घेऊन पाटलांच्या पाठीमागे निघाले आहेत,  मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,
ह्या जरांगे पाटलाला मॅनेज कसं करायचं?  होय ह्या पाटलांच्या पोराला मॅनेज कसं करायचं?  हा एकच सवाल मंत्रालयाच्या भिंतीभिंतीतून घुमतोय.

आता माझी तिरडी तरी निघल नायतर आरक्षणाची मिरवणूक तरी निघल असं म्हणणाऱ्या पाटलाला मरणाची भिती तरी कशी दाखवायची? ‘मी मेलो तरी आरक्षणाचा लढा चालूच ठेवा’ असं घरच्यांना सांगून घराला पाठ दाखवणाऱ्या बाप माणसाला बायका पोरांच्या आयुष्याची धास्ती तरी कशी दाखवायची? ज्यानी निम्मं आयुष्य आरक्षणाच्या लढ्यात मोकळं केलं, वडिलो पार्जित चार एकरातील दोन एकर ज्यानं आरक्षणाच्या लढ्यासाठी फुकून टाकली, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तरी कसे ठेवायचे? ज्याच्याकडं स्वत:ची दुचाकी गाडी नाही, त्याच्या घरी इडी पाठवून तरी काय उपयोग?  त्याच्या चारित्र्यावर चिखल तरी फेकता आला असता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नसानसात भिणलेल्या या पाटलाचा पाय तरी कसा घसरणार?

असे शेकडो सवाल घुमाहेत मंत्रालयात, आणि तो पाटील लाखोची फौज घेऊन मुंबईकडं कुच करतोय.,, ज्याला आजवर आम्ही फाटका समजलो तो पाटील लाखो पायदळ घेऊन, लवाजामा, शिधा बरोबर घेत वाहनांवर स्वार होऊन निघालेत, ज्याला आजवर आम्ही फक्त आणि फक्त गृहित धरलं, दुर्लक्ष केलं, तो पाटील सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर नाचायला येतोय. यातील सत्तेवर असलेले काही महाभाग जरांगे पाटलांची नक्कल करून अपशकुन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत,काल दिवसभर व रात्रभर जरांगे पाटील लाखो लोकांच्या साक्षीने गाडीच्या टपावर उभे होते, कोणालाही न दुखवता प्रत्येकाचे अभिवादन स्विकारत होते,हात जोडून समाजातील माता बघीनिं तसेच स्वागतासाठी आलेल्या लाखो मराठा बांधवांना अभिवादन करून आभार मानत होते, दुपारचं जेवण त्यांनी गाडीच्या टपावर उभे राहूनच केले, सकाळी आठ वाजता सुरू झालेला मराठा मोर्चा आज सकाळी सात वाजता लोणावळ्याला पोहचला, दिर्घ काळ उपोषणामुळे प्रक्रुती साथ देत नाही, कमरेला बेल्ट बांधुन चालावं लागतं, क्षणभरही विश्रांती नाही, जरांगे पाटलांचा आत्मविश्वास आणि निर्धार बघितल्यावर राजा शिवछत्रपती, तसेच नेपोलियन बोनापार्ठ च्या प्रराक्रमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, *रात्री तिन वाजता मोर्चामध्ये सामील असलेली एक चिमुरडी मुलगी विश्रांतीसाठी गया वया करते, तेव्हा ते काही काळ विक्षाती साठी थांबतात*शेकडो वर्षांनंतर समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिर्घ काळ नेतृत्व टिकलं पाहिजे,आज रात्री उशिरा हा लाखो मराठा बांधवांचा महामोर्चा नवीमुंबई च्या एपीएमसी मार्केट मध्ये दाखल होइल,२६ जानेवारी ला मुंबईत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आझाद मैदानाकडे कुच करेल, कदाचित जगातील सर्वांत मोठा मोर्चा म्हणून त्याची नक्की नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, मुंबईकरांना त्रास होइल असं काहीही न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनही करायला जरांगे पाटील विसरले नाहीत, मुंबईत शांततेत दोन दिवस उपोषणाला बसलो तरी आपल्याला आरक्षण मिळणार आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंब शरीरात असेपर्यंत मी समाजासाठी लढत राहिन, मराठ्यांची एकजूट तुटु देवु नका,अशी आर्त हाक द्यायलाही ते विसरले नाहीत.
शब्दांकन : कुबेर जाधव , समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक, ्मो नंबर ९४२३०७२२०३*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here