जनसेवे साठीच माझी उमेदवारी,माळवाडीत आणणार विकास कामांची शिदोरी …!

0
294

आपली निशाणी : टीव्ही :                             

  भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती ,बातम्या साठी संपर्क : ९१५८४१७१३१                               

 

  देवळा : तालुक्यातील माळवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा जोश जसजसा वाढत चालला तसतसा विरोधकांचा होश उडत चालला असल्याचे चित्र दिसत आहे.वॉर्ड क्रमांक ३ ( तीन ) मध्ये अहिरे घराण्यात गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ग्रामपंचायतीची सत्ता येथील भाबड्या मतदारांनी बहाल केली आहे.आज सुद्धा त्यांच्याच वंशावळ मधील सदस्य म्हणून कार्यरत होता.तरी सुद्धा त्याने कोचेच न ऐकता सत्ता माझ्याच घरात पाहिजे म्हणून चक्क लहान भावाच्या पत्नीस उभे केले आणि त्यांच्याच वस्तीत मीटिंग घेऊन सांगतो जर आपल्या चर्मकार समाजाने कोणी निवडणुकीस उभे राहत असेल तर मी माघार घेतो.परंतु बौद्ध समाजास मी उभे राहू देणार नाही.जर ते उभे राहतील तर मी त्यांचे विरुद्ध निवडणुकीस उमेदवार म्हणून माझ्या भावाच्या पत्नीस उभे करणार.या त्याच्या बोलण्या मुळे काहींनी विरोध सुद्धा केला होता पण गड्या ने उभे केलेच.का तर म्हणे बौद्ध समाजाचे एकटे घर आहे त्यांनी का उमेदवारी करावी ? का निवडणुकीस त्यांनी उभ राहव ? असा संताप आणणारा प्रश्न माझे विरोधकांनी केला होता.

 

माझ्या मतदार मायबाप माझे बौद्ध समाजाचे एकटे घर जरी आहे परंतु गेल्या तीन तर चार पिढ्यांपासून साधारणतः ८० तर ९० वर्षांपासून च्या पुढील कालावधी पासून आमच्या घरास आज सुद्धा माझ्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या वारसांनी तसेच संत रोहिदासजी महाराजांच्या वारसांनी  एकटे राहू दिलेले नाही.अनेक कार्यक्रमात लग्न समारंभ असो की कोणतीही महामांवची जयंती असो की कुठल्याही देवांच्या मूर्ती स्थापनेची वर्गणी असो ते माझ्या घराला भेट देऊन सांगतात किंवा आमचा वरील पैकी कोणताही कार्यक्रम असो भरगच्च गर्दीने माझे बांधव , माय बाप कार्यक्रमास उपस्थित राहतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात.अपवाद फक्त हाच व्यक्ती आहे की सत्तेचे भूत आपल्याच घरात पाहिजे आणि रोहिदास वाड्यात माझीच हुकूमशाही राहील .आणि आहेच तसेच आजही रोहिदास समाजासाठी असलेले जुने समाज मंदिर याने काबीज करून त्याठिकाणी याच व्यक्तीचे सामान पडले आहे.मीटिंग याने बोलावली होती तेव्हा यास येथील रहिवाशांनी सांगितले सुद्धा की समाज मंदिरातले तुझे सामान बाहेर काढ पण रगेल माणसाने ते सामान आजही काढलेले नाही.बिच्चारे वस्तीतील लोक हे मुकाट्याने बसून सगळे सहन करतात.सांगायचं उद्देश असा की,सगळे मिळून गुण्यागोविंदाने एकत्र राहून विकास कामे करू असा उद्देश ह्या व्यक्तीचा नसून फक्त मला सत्ता द्या मी मग आहेच दडपशाही , धाक दाखवून दरारा निर्माण करायला.म्हणून माझी सगळ्या रोहिदास मायबापांस विनंती आहे ही दडपशाही , गुंडगीरी नको पाहिजे असेल यातून मुक्त व्हायचे असेल तर टीव्ही निशाणी चे बटन दाबून प्रचंड मतांनी मला विजयी करून वॉर्ड क्रमांक ३ ( (तीन ) मध्ये  नक्कीच विकास कामांचे नवे पर्व सुरू करून त्याचबरोबर माळवाडी गाव विकासासाठी पुढे आणन्या साठी माझ्या माय बाप यांचा आशीर्वाद मतदान करून मला म्हणजेच माझ्या टीव्ही निशाणीचे बटन दाबून मला निवडून दिल्यास समस्त माळवाडी गावातील माझ्या मतदार मायबापांचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा विडा माझे सासरे भारत पवार आणि माझे पती प्रमोदकुमार पवार यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सल्ल्याने पूर्ण करणार हे माझे वचन आहे.

चला तर मग  येत्या रविवारी ५ तारखेस   वॉर्ड क्रमांक तीन च्या विकासासाठी एकत्र येऊ टीव्ही निशाणीचे बटण दाबून आपण सर्व विजयी होऊ . *माझा विजय हा तुमचा सगळ्यांचा विजय आहे.माझी अस्मिता तुमचा जिव्हाळा आहे. ” म्हणूनच म्हणते मी माझे एकटे घर नाही माझे भाऊबंद पूर्ण माळी समाज आणि रोहिदास समाजच आहे.टीव्हीला निवडून आणू माळवाडी गावात विकास पर्व आणू ” माझी उमेदवारी जनसेवा करण्यासाठीच असून आपल्या वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आणि सोबतच माळवाडी गावात विकास कामांची शिदोरी आणण्यात सक्षम असणार. हा माझा शब्द असणार म्हणूनच माझ्या टीव्ही निशाणीचे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे भावनिक आवाहन उमेदवार सुरेखा   प्रमोदकुमार पवार यांनी मतदार माय बापास केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here