प्रत्येक क्षण नागरिकांसाठी , प्रत्येक क्षण विकासासाठी : म्हणून मतदान करा टीव्हीलाच विकासासाठी

0
241

निशाणी – टीव्ही ( दूरदर्शन )( छाया  चित्रात वरती पहावी )                                                    भारत पवार  : मुख्य संपादक : पत्रकार नियुक्ती साठी तसेच जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क : मो.९१५८४१७१३१                                                  देवळा / माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकी साठी मी वॉर्ड क्रमांक ३ ( तीन ) मधून उमेदवारी करीत असून माळवाडी गाव महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , महान संत रोहिदासजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जपणाऱ्या माझे सासर माळवाडी असलेल्या गावातील मतदार राजांची मी सून म्हणून आलेली आणि मला गावातील सर्वच माझे आई वडील समान असणारे माझे माय बाप यांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या माय बाप मतदारांच्या विश्वासाने वॉर्ड क्रमांक ३ च्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेली असून माझी निशाणी टीव्ही ( दूरदर्शन) आहे.मी आपणास विनंती पूर्वक आणि शपथ घेऊन शब्द देते की , तुमच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपल्या वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आजही अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द तर आहेच परंतु मला जर प्रचंड मतांनी निवडून दिले तर मी नाही तुम्हीच निवडले आहात असे मी म्हणेन आणि हा विजय माझा नाही तर समस्त माळी समाजाने दिलेला आशीर्वाद , सर्व रोहिदास समाजाने दिलेले पाठबळ म्हणून हा विजय तुमचाच असणार आहे.यात तुमचीच शान असणार आहे.

म्हणून मी जरी निवडून आले तरी विकास कामे करत असताना तुम्हा सगळ्यांचा सहभाग मोठा असणार आहे.तुमच्या सल्ल्यानेच विकास कामे करण्यासाठी मी पुढे सरसावनार आहे यात तीळ मात्र बदल होणार नाही.म्हणून माझा विजय हा तुमचा विजय असणार मी नाममात्र सदस्य म्हणून जरी असणार तरी मोलाचे मार्गदर्शन माझ्या मतदार रुपी असणाऱ्या माय बाप यांचेच असणार.निवडून आल्यास आणि विकास कामे करत असताना हवेत उडायचे नसते ,पाय जमिनीवरच असावे लागतात. हा मोलाचा सल्ला देणारे माझे सासरे पत्रकार भारत पवार यांनी सांगितल्या प्रमाणे माझे पाय जमिनीवरच कायम ठेऊन माझ्या वॉर्ड क्रमांक ( ३) तीन च्या मतदारांसाठी , माझ्या माय बाप समान असलेल्या नागरिकांसाठी माझा प्रत्येक क्षण नागरिकांसाठी ,प्रत्येक क्षण वॉर्ड विकासासाठी असणार आहे.म्हणूनच तुमचे अमूल्य मत दान करताना ते टीव्ही (दूरदर्शन) चित्रा समोरील नंबर दोन चे बटन दाबून मतदान करावे आणि वॉर्ड विकासाला तसेच गाव विकासाला चालना द्यावी असे आवाहन सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार आणि प्रमोद पवार यांनी संयुक्तरित्या मतदारांना केले आहे.

चांगले काम करत असताना चांगले काम करणाऱ्यांच्या रस्त्याला काटे असतातच याची जाणीव सासरे पत्रकार भारत पवार यांनी मला करून दिलेली आहेच परंतु आपण खचनारे नाहीत.चांगले काम करण्याचे वचन दिलेल्या आपल्या मतदारांचा विश्वासघात होणार नाही. मतदारांना विश्वासात घेऊनच कामे केले जातील रस्त्यावर कितीही काटे टाकलेले असतील ते काटे उचलून खड्ड्यात टाकू पण चांगले काम करूनच दाखऊ असा मोलाचा सल्ला देणारे माझे सासरे भारत पवार यांनी यावेळी सांगितले. मावळते सरपंच शिवाजी( अण्णा ) वामनराव बागुल यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक चांगले काम संपूर्ण गावात करून दाखवली ही काम करत असताना सरपंच शिवाजीअण्णा बागुल ,प्रशासक तथा ग्रामसेवक संभाजी देवरे यांना अनेक शुक्राचार्यांनी त्रास सुद्धा दिला आहेच तरी सुद्धा चांगली कामे करण्यात हे पदाधिकारी मागे हटले नाहीत.आणि आज तेच शुक्राचार्य माझ्या विरोधकांचे प्रचार करत आहेत.अशा शुक्राचार्यांच्या उमेदवारांना निवडून दिल्यास गाव भकास केल्याशिवाय हे झरीतील शुक्राचार्य थांबणार नाहीत.ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.म्हणून त्यांच्या प्रचारास बळी न पडता आमच्या उमेदवाराच्या टीव्ही निशाणीचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन खंडू डांबरे , पत्रकार भारत पवार, सुरेश तुळशीराम बागुल, महादू बागुल, संतोष जाधव , प्रमोद पवार व उमेदवार सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here