पनवेल – दि.12.कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “:दीपक शिंदे —
महिलांवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ उत्तर रायगड भाजपाच्या महिला आघाडीतर्फे पनवेल येथे छ. शिवाजी महाराज चौक येथे असंवेदनशील सरकारचा निषेध करून तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचार कमी व्हावेत, महिलांना सुरक्षा व गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी, कोविड सेंटरमध्ये महिलांना वेगळा विभाग असावा, जळीत कांड,सामूहिक बलात्कार, लैंगिक शोषण,अत्याचार करणाऱ्यांवर कडक शिक्षा व्हावी, महिला आयोगाची स्थापना लवकरात लवकर करावी, बलात्काराच्या गुन्ह्यांविषयी केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन उत्तर रायगड भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी पक्षाचा बेजबाबदारपणा नाकर्तेपणाविषयीचा संताप मा.जिल्हाध्यक्ष प्रशांतजी ठाकूर यांनी ह्यावेळी व्यक्त केला.
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष यांची महिलांविषयी असलेली असंवेदनशीलता व घाणेरडे राजकारण याबद्दल मत व्यक्त केले..
या प्रसंगी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर,महापौर कविता चौतमल, उत्तर रायगड महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील,जिल्हा संघटनमंत्री अविनाश कोळी,पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत,पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे,उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर,सरचिटणीस विनोद साबळे,महिला जिल्हा चिटणीस चारूशीला घरत, सरचिटणीस दर्शना भोईर, पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत,वर्षा नाईक,उरण महिला मोर्चा अध्यक्षा राणी म्हात्रे मृणाल खेडकर,कामोठे मंडलाध्यक्ष विनिता पाटील,खालापूर महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता दळवी कर्जत महिला मोर्चा अध्यक्षा सरस्वती चौधरी,खारघर तळोजा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील,नगरसेविका कुसूम म्हात्रे, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे,हर्षदा उपाध्याय,भुपेंद्र पाटील,नीता माळी,बिना गोगरी,सपना पाटील, सुनिता गुरव,राखी पिंपळे,धापटे रसिक शेट्ये,स्नेहल सावंत, अमरिष मोकल,अमर उपाध्याय, सुरेखा गांधी,अश्विनी अत्रे,योगिता कडू, राजेश्री नायडू असे अनेक महिला कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.




