नाशिक क्राईम विशेष :- एच.ए.एल.( HAL)शी गद्दारी करणारा “भामटा” दीपक शिरसाठ ने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले पाकिस्तानशी गुटूर गु करू लागला,एच.ए.एल.प्रशासनास घाम फोडला ,पोलिसांनी त्याला वेळीच तुरुंगात दाबला …
1 min read
छाया चित्रात दिसणारा हाच तो भामटा सगळ्यांना घाम फोडणारा .

नाशिक –ओझर टाऊनशिप – कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “-विशेष – महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देशातील आर्थिक व्यवस्थेचा मजबूत कणा म्हणून नाशिक जिल्ह्या कडे पाहिले जाते कारण आमच्या ह्या जिल्ह्यात दुभती गायी प्रमाणे आर्थिक व्यवहार होत असतो.जिल्ह्यात नोट प्रेस आहे,त्याचप्रमाणे बहुसंख्य मुद्रित सामग्री बनविणारी कंपनी आहे तर ओझर ( मिग ) येथे एच.ए.एल. अर्थातच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची विमान बनविणारी महत्वपुर्ण मोठीच कंपनी आहे .तसेच नाशिक जिल्ह्यातील भूमी ” पुण्यभूमी “म्हणून देशात / जगात ओळख आहे कारण येथे कुंभ मेळा पण भरतो देश – विदेशातील संत,महात्मे ह्या पुण्यभूमीत येत असतात अशा पुण्य भूमीत जन्मला तो गद्दार दीपक शिरसाठ नावाचा भामटा आणि त्याने ह्या पुण्यभूमीस मोठाच गालबोट लावला तर एच ए एल च्या स्थानिक प्रशासनासह कर्मचारी, अधिकारी तसेच बंगळूर येथील अधिकाऱ्यांना सुद्धा घाम फोडला , त्यांच्या झोपा महाग केल्या त्याची सविस्तर माहिती आमच्या देशभरातील ” महाराष्ट न्यूज ” च्या विशेष म्हणून वाचकां साठी – दीपक शिरसाठ हा HALकंपनीत नोकरी करत होता तो काही इंजिनियर नव्हता कर्मचारी म्हणून कामास होता तो जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील असल्याचे समजते. HAL मध्ये सद्या ब्राम्होस या क्षेपणास्त्र चे सुखोईवर आरोहणही केले जाते,देशाच्या सुरक्षाला बलाढय बनविण्यासाठी हे क्षेपणास्त्र तसेच लढाऊ विमान अतिशय महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.जगात HAL ह्या कंपनीने मानाचे स्थान पटकावून भारता साठी कंपनीच्या सर्वच कर्मचारी – अधिकारी यांनी ” सोनेरी ” झालर पसरविली आहे.HAL कंपनी स्थापने पासून कर्मचारी , अधिकाऱ्यां मध्ये अतूट – विश्वासाचे नाते होते हेरगिरी सारखे घाम फोडणारे प्रकरण आज तागायत कधी घडले नव्हते ते ह्या दीपक शिरसाठ भामट्याने केल्याचे ए टी एस ( दहशत वाद विरोधी ) पथकास समजल्याचे कळते.ओझर ( मिग) येथील HAL शी गद्दारी करणारा “भामटा” दीपक शिरसाठ (41)याने निच पणाचा कळस गाठला आणि कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले व पाकिस्तानशी गुटूर गु अर्थात येथील एच ए एल विषयी महत्वाची माहिती दिल्याची धक्कादायक माहिती ए टी एस पथकास कळाली की भारतीय बनावटीच्या विमानांची गोपनीय माहिती , विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे कर्मचारी असलेला हा भामटा दीपक कंपनीत मोबाईल बंदी असताना सुध्दा खिशात मोबाईल घालून कंपनीत बिनदास मोक्कार हिंडत असे ह्या शॉप वरून दुसऱ्या शॉप वर जात असे अगदी मोकळ्यापणे धाक नसलेल्या मोक्कार पणे वावरत असे समजते,त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल, पाच सिम कार्ड,दोन मेमरी कार्ड पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपासा साठी हे साहित्य फॉरेन्सिक लॅब कडे पाठविले आहे.भा द वि कलम 3,4 आणि 5 शासकीय गुपिते अधिनियम 1923 नुसार त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो मुख्य आरोपी असला तरी त्यास कोणाची साथ आहे की नाही याचा तपास पोलिस कसोशीने करणार असून संशयित दीपक शिरसाठ यास न्यायालयाने पुढील तपास कामी 10 दिवसांची पोलीस कोठडीत टाकले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नासिक रोडच्या देवळालीकॅम्प परिसरातील एका मजुराने लष्करी छावणी परिसरातील काही फोटो काढून व्हाट्सआप द्वारे थेट पाकिस्तान ला पाठविल्याची घटना ताजीच असताना हा परप्रांतीय पाण्याच्या टाकीचे काम करणारा 21 वर्षांचा मजूर आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.हि घटना ताजी असतांना जिल्ह्यातील एच ए एल मधील हेरगिरीचा धक्का दायक मामला उघडकीस झाला.ह्या धक्कादायक मामालाचा आणि दरदरून घाम फोडणाऱ्या प्रकरणाचा तपास मुबंईतील बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या हाती घेतल्याने प्रकरणातील घटनेचे गांभीर्य वाढले आहे. * शब्दांकन : लेेखन –
भारतराज पवार , मुख्य संपादक,” महाराष्ट्र न्यूज “9158417131.
महाराष्ट्र न्यूज करिता – महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात,प्रत्येक तालुक्यात,प्रत्येक जिल्ह्यात – पत्रकार , प्रतिनिधी , जाहिरात प्रतिनिधी तसेच संपादकीय मंडळावर विविध पदे भरणे आहेत . आपण लोकशाही चा चौथा आधार स्तंभ असलेला ” पत्रकार ” बनू शकता. संधीचा फायदा उचला आणि आपले भविष्य घडवा .
संपर्क : 9158417131