हृदय पिळवटून टाकणारी घटना : कोणी नाही कोणाचे हुशार धन काय कामाचे ! प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अरुण गोधमगावकरांनी वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

0
96

 

भारत पवार : मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज ” संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क : मो.9158417131

लातूर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : डाॅ. अरुण गोधमगांवकर सर, हे एक नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर होते.त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले. त्यांनी खूपच पुण्य प्राप्त केले असेल तरी त्यांच्या नशिबी एक मुलगा आणि एक मुलगी तेही डॉकटर असूनही डॉ. गोधमगावकर यांना वृध्द आश्रमात राहण्याची वेळ यावी येवढेच नाही तर त्यांच्या मृत्यू समयी त्यांच्या डॉकटर मुलाने जवळ येण्याचे कष्ट न घेता उलट भयानक उत्तर वृद्धश्रम चालकांना दिले ….असेही (ना ) लायक डॉ.पुत्र असतात हे घडलेल्या सत्य घटनेवरून कळते….

डॉ.अरुण गोधमगावकर  मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात राहत होते, ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगाव चे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले.

त्यांनी स्वतःच्या मुलाला एम. डी. डॉक्टर व मूलीलाही स्री रोग तज्ञ डॉक्टर करून, काही वर्षापू्र्विच त्या दोघांनाही अमेरीकेला पाठवले होते, सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत, सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने, आई वडीलाकडे लक्ष द्यायला कोणिच रिकामे नव्हते.

उतारवयात डॉक्टर साहेबांच्या पत्निचे निधन झाले, त्यावेळेस देखील अमेरिका मधून त्यांचा ना मूलगा आला, ना ही मूलगी आली, मग गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर य़ेथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये रहायला गेले, चार वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला, आणि नुकतेच डॉ.अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले,

वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरीकास्थीत मुलगा, मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु “कोणाचेही य़ेणे होणार नाही, आमचा कसलाही आक्षेप नाही, तूम्ही अंत्यविधी कार्यक्रम ऊरकून घ्या”,असे सांगितले.अखेर तेथील आश्रमवासीयांनी अतिशय जड अंतकरणाने डॉक्टरांना अश्रूनयनांनि निरोप दिला.

शेवटी मनात विचार येतो की, कोणी नाही कोणाचे, हूशारी-धन काय कामाचे? पोरबाऴ कोणाचे? घर संसार कोणाचा? लेकी – सूना कोणाच्या? शेवटी कोणीच कोणाचे नाहीत का? मरावे एकट्यालाच लागले, अशी वाईट परीस्थीती आहे.

समाज अतिशय वाईट परीस्थितीतून जात आहे असे वाटते. जी परिस्थिती डॉक्टरांवर आली ती कुणावरच येऊ नये.

ज्या माता पित्याची स्वतः जन्म दिलेली मुले जर, त्या माता पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला अजिबात वेळ नाही, त्यापेक्षा मोठे दुर्दैव, त्या मातापित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही.

यातुन एक गोष्ट सिध्द होते…कि शिकून सुशिक्षीत होण्यापेक्षा अडाणी राहुन सुसंस्कृत राहिलेल कधीही चांगलं..

आपल्या आई वडीलांची काळजी घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे._

कृपया सर्वांना विनंती आहे इतर फालतू किंवा टाईमपास मेसेज आपण तर लगेच फॉरवर्ड करतो.
पण असे मेसेज खऱ्या अर्थाने फॉरवर्ड केले पाहिजे.

आपणही नक्कीच हा मेसेज लगेच सर्वांना व सर्व ग्रुपवर फॉरवर्ड करताल अशी अपेक्षा आहे

*नक्कीच शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here