इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून बौद्ध तरुणास मारहाण

0
52

भारत पवार : मुख्य संपादक : पत्रकार नियुक्ती साठी तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१              संभाजीनगर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  संभाजीनगर जिल्ह्याचे एम आय एम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा उपस्थितीत व जलील यांच्या घरासमोर त्यांच्या सांगण्यावरून दीपक सोनवणे या दलित तरुणाला जलील यांच्या लोकांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी रोजी जबर मारहाण केली… त्याच दिवशी दीपक सोनवणे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेला व्हिडिओ….

लिंक –
https://www.instagram.com/reel/Che1wXhgTaV/?igshid=YmMyMTA2M2Y

इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याच्या हेतूने अनुसूचित जाती (बौद्ध) समाजातील युवक दीपक सोनवणे या इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केलेल्या युवकाला मारहाण, आर्थिक फसवणूक, छळ करून त्याची सुंता केली गेली…तसेच खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत व जलील यांच्या घरासमोर त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या माणसांनी दीपक सोनवणे यास जबर मारहाण केल्याची माहिती सोनवणे याने पत्रकार परिषदेत दिली.

या अतिशय संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील तथ्य सर्वांसमोर यावे व पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा या उद्देशाने दिनांक १७-११-२०२२ रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला भाजपा अनुसूचित जाती आघाडी महाराष्ट्र चे सरचिटणीस श्री जालिंदर शेंडगे, पिडीत तरुण दीपक सोनवणे व त्याची आई श्रीमती बालिका सोनवणे व डेमोक्रॅटिक पीपल्स मुव्हमेंट चे श्री राहुल काकडे हे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत पिडीत दीपक सोनवणे याने सर्व हकीकत सांगितली व पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली…

यावेळी श्री जालिंदर शेंडगे यांनी मांडलेले मुद्दे..
१. जिल्ह्याचा खासदार हा सर्व जनतेचा खासदार असतो पण या प्रकरणात खासदार जलील यांनी जातीयवादी भूमिका घेतली, त्यांच्या गुंडांनी खासदाराच्या उपस्थितीत व सांगण्यावरून दलित तरुणाला मारहाण केली हे अत्यंत घृणास्पद आहे. खासदार जलील वरती ॲट्रॉसिटी अंतरंग गुन्हा दाखल झाला पाहिजे.

२. इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यासाठी दीपक सोनवणेची सुंता केली गेली हे अतिशय गंभीर असून हा लव्ह जिहाद चा उलट प्रकार आहे. लव्ह जिहाद मध्ये हिंदू मुलींना फसवून मुस्लिम केले जाते पण या घटनेत बौद्ध मुलाला मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गंभीर प्रकारची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही पोलिस आयुक्त यांना भेटणार आहोत.

३. आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून.. बळजबरीने होत असलेल्या धर्मांतराचा विरोध करावा.

• दीपक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेली माहिती व दाखल केलेल्या तक्रारीतील महत्वाचे मुद्दे –

– छत्रपती संभाजीनगर शहरातील दीपक सोनवणे व सना फरहीन शेख हे दोघे इंजिनियरिंग चे शिक्षण घेताना वर्ग मित्र होते, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले पुढे फरिन ने लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्याला दीपक ने लगेच होकार दिला… पण सना व तिच्या घरच्यांनी दीपक ला इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याची अट घातली त्याला दीपक ने नकार दिला आणि मग दीपक व त्यांच्या घरच्यांना प्रचंड त्रास दिला गेला… सना, तिचे आईवडील व नातेवाईकांनी दीपक ला सना च्या घरी नेले, त्याला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली व धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला आणि त्याला मुस्लिम डॉक्टरकडे नेवून त्याची सुंता केली…

– विशेष म्हणजे यात २० ऑगस्ट २०२२ रोजी आलेल्या घटनेत संभाजीनगर जिल्ह्या चे एम आय एम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा उपस्थितीत व जलील यांच्या घरासमोर त्यांच्या सांगण्यावरून दीपक सोनवणे जलील यांच्या लोकांनी जबर मारहाण केली, खासदार जलील यांच्या सुरक्षा रक्षकाने दीपक चा मोबाईल हिसकावून घेतला व जलील यांच्याकडे दिला मारहाण केली पोलिस वेळेत त्या ठिकाणी आले व दीपक ला सोडवून पोलिस स्टेशन ला घेवून गेले परंतु या घटने संदर्भात पोलिस स्टेशन ला तक्रार देवूनही गुन्हा दाखल झाला नाही.

– धर्मांतर करण्यासाठी त्याची मैत्रीण सना ही दीपक ला तिच्या संस्थेत क्लाउड कॅम्पस येथे बोलावून प्रोजेक्टर वरून मुस्लिम धर्मप्रारक झाकीर नाईक चे व्हिडिओ दाखवत असे तसेच इस्लाम ची माहिती सांगून नमाज पठण करण्याचा आग्रह करत असे.

– धर्मांतर करण्याच्या हेतूने व बदनामीची धमकी देवून धर्मांतर करण्या साठी प्रचंड मोठा दबाव आणला गेला, आर्थिक फसवणूक केली, मोठी खंडणी उकळली, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, शारीरिक – मानसिक छळवणूक, धमक्या, खोटे गुन्हे दाखल केल्याने दीपक ला दोन महिने व त्यांच्या वडिलांना २० दिवस तुरुंगवास सुद्धा झाला.

– सोबत दीपक सोनवणे ने पोलिस आयुक्त ऑफिस ला दाखल केलेल्या दोन तक्रारी जोडल्या आहेत ज्यामध्ये या प्रकरणाची सर्व माहिती आलेली आहे. यात तक्रारीत २० ऑगस्ट झालेल्या मारहाणीची तक्रार दिनांक २२ ऑगस्ट ला दिली आहे ज्यात खासदार इम्तियाज जलील चा उल्लेख आहे. तसेच मारहाण झाल्याच्या दिवशी पिडीत दीपक सोनवणे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात खासदार इम्तियाज यांचे नाव घेवून घटनेची माहिती दिली आहे.

– दीपक याने पोलिस आयुक्त यांना दिनांक २८ ऑगस्ट २०२२ ची जी तक्रार दिली आहे त्यात सविस्तर घटनाक्रम दिला आहे. मात्र इम्तियाज जलील व तेथील घटनेचा उल्लेख केलेला नाही… त्याबद्दल दीपक म्हणाला की, पोलिस व काही जणांनी त्याला म्हटले की खासदाराचे नाव टाकले तर गुन्हा दाखल होणार नाही, तसेच तुझ्यावर दबाव टाकतील आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून नंतर खासदार यांचे नाव घेतले नाही. पत्रकार परिषदेमध्ये मात्र दीपक ने सर्व घटनाक्रम सांगितला आहे.

अधिक माहितीसाठी आपणास  संपर्क करावा असे ही शेंडगे व काकडे यांनी यावेळी सांगितले.
श्री. जालिंदर शेंडगे
भाजपा प्रदेश सरचिटणीस, अनु.जाती मोर्चा, महाराष्ट्र.
संपर्क – 9923254555

श्री. राहुल काकडे
Democratic People’s Movement, Marathwada.
सचिव.
+919970409691

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here