भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारत पवार _ देवळा शहर आणि तालुक्यातील रेशन दुकानधारकांनी गेल्या दसरा आणि दिवाळीत दिवाळी मोठी खुशीत आणि जोरदार साजरी केल्याची जोरदार चर्चा असल्याचे समजले असून ते जेवले तुपाशी तर रेशन कार्ड धारक कोरडा पडला घशाशी अशी अवस्था रेशन दुकानधारकांनी रेशन कार्ड धारकांच्या बाबतीत करून टाकल्याने याबाबतीची चर्चा खास कसमादे टाइम्स (साप्ताहिक ) आणि महाराष्ट्र न्यूज (ऑनलाईन न्यूज चॅनल ) चे राज्य मुख्यसंपादक तथा माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भारत पवार यांच्या पर्यंत पोहचल्याने त्यांनी देवळा येथील तहसीलदार कुलकर्णी आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी शारदा गावंडे मॅडम यांची काल समक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली त्याबाबत माहिती अधिकार कायद्या नुसार माहिती मागविण्यात आली असून दसरा आणि दिवाळी सण गरिबांना गोड साजरा करण्यात यावा सगळ्यांची दसरा दिवाळी सण गोडीने साजरा करून आनंद साजरा करण्यात यावा या उद्देशाने केंद्र सरकारआणि महाराष्ट्र सरकारने पुरवठा विभागा मार्फत रेशन दुकान धारकांकडे साखर दिली होती.ती साखर रेशन कार्ड धारकांना मोफत वाटप करावी असा आदेश रेशन दुकानधारकांनना देण्यात आला होता परंतु अनेक रेशन कार्ड धारकांना दसरा आणि दिवाळीत रेशन दुकानधारकांनी साखर दिली नसल्याने कार्ड धारकांच्या ही हक्काची आणि मोफत साखर गेली कुठे ? त्यामुळे कार्ड धारकांच्या दिवाळी _ दसरा सण साखरे विना गेल्याने जनतेत संताप व्यक्त केला जातअसून रेशन दुकानदार मात्र जेवले तुपाशी जनता मात्र साखर _ साखर करून कोरडा पडला घशाशी अशी चर्चा रंगू लागली असून ही साखर रेशन दुकानदारांनी परस्पर चढ्या भावात विकली की काय ? याबाबत लवकरच पर्दाफाश पत्रकार तथा राज्य मुख्यसंपादक आणि माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भारत पवार हे करणार असून त्याबाबत तपासाची चक्रे वेगाने फिरत असून जर न्याय तालुक्यात न मिळाल्यास संबंधित रेशन दुकानांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांचे तक्रार करणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवून पुणे साखर आयुक्त आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री , मुख्य मंत्री यांचे कडे तक्रार दाखल करून गेलेल्या साखरेचा पर्दाफाश करून रेशन दुकानदारांकडून झालेला अन्याय त्यांनी गरीबांचा तोंडून हिरवलेला घास याबाबत रेशन दुकानदारांना किंमत मोजावी लागणार आणि जनतेस आपण न्याय मिळून देणार याबाबत सविस्तर पुन्हा लवकरच वाचा ….. कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज मधून





