Home Breaking राज्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित कर्ज प्रकरणात तात्काळ कार्यवाही करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत...

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित कर्ज प्रकरणात तात्काळ कार्यवाही करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : रघुनाथ कुंवर

0
119

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : पत्रकार नियुक्ती साठी तसेच आपल्या जाहिराती व बातम्या साठी संपर्क करा . मो.९१५८४१७१३१

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : हाराष्ट्र राज्यात बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून हाती आलेले पीक वाया गेले तर सद्याच्या स्थितीत कांदा पीकास पाहिजे तसा भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.होत्याचे नव्हते झाल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.राज्यातील तमाम शेतकरी बाधवांच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीककर्ज , शेतीशी निगडित कर्ज प्रकरणे बऱ्याच कालावधी पासून किरकोळ कारणांसाठी प्रलंबित आहेत आधीच शेतकऱ्यांवर निसर्गाने बेमोसमी अवकाळी पावसाने अवकृपा केली त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाल्याने आणि त्यातच बँकेतील अधिकारी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात किरकोळ कारण सांगून टाळाटाळ करत असलयाने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा दायक हातभार लावावा म्हणजे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटातून मुक्त होतील अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी व महाराष्ट्र न्यूज चे विभागीय संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कुंवर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.कुंवर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे मार्फत समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढून त्यांचे प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा व अशी प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजुरीचे आदेश द्यावेत अशी मागणी आर.पी.कुंवर ( रघुनाथ कुंवर ) यांनी मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here